पुणे (20 मार्च 2024)- प्रमोशन फेरीत आज दुसऱ्या दिवशी पहिली लढत अहमदनगर विरुद्ध बीड जिल्हा यांच्यात झाला. अहमदनगरच्या प्रफुल झवारे व शिवम पठारे यांनी चतुरस्त्र चढाया करत सामन्यात आघाडी मिळवली. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला बीड संघाला ऑल आऊट करत 11-01 अशी आघाडी मिळवली होती. ह्याच आक्रमक खेळ सुरू ठेवत अहमदनगर संघाने नवव्या मिनिटाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यात भक्कम आघाडी मिळवली.
अहमदनगर संघाकडून प्रफुल झवारे ने आक्रमक खेळ करत आपला सुपर टेन पूर्ण करत सामन्यावर आपली छाप पाडली होती. अहमदनगर संघाने मध्यंतरापूर्वी 3 वेळा ऑल आऊट करत 33-08 अशी आघाडी मिळवली. शिवम पठारे ने सुद्धा चांगले गुण मिळवले. बीड कडून शंकर मेघाने ने उत्कृष्ट खेळ केला. तर तेजस झगडे पकडीत चांगला प्रदर्शन केला. पण अहमदनगर संघाने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
अहमदनगर संघाने 55-24 असा विजय मिळवला. अहमदनगर संघाकडून प्रफुल झवारे ने सर्वाधिक 18 गुण मिळवले. तर शिवम पठारे व विशाल ब्राह्मणे यांनी प्रफुल झवारे ला चांगली साथ दिली. सौरव मेद ने उत्कृष्ट पकडी करत एकूण 7 गुण मिळवले. तर बीड कडुन शंकर मेघाने ने चढाईत 9 गुण मिळवले. व तेजस झगडे ने पकडीत एकूण 4 गुण मिळवले. (Ahmednagar team’s second win in a row in the promotion round)
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- सौरव मेद, अहमदनगर
कबड्डी का कमाल – विशाल ब्राह्मणे, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत सांगलीचा विजय, मुंबई शहरच्या राज आचार्यची खेळी व्यर्थ
प्रमोशन फेरीत अहमदनगर, कोल्हापूर, पालघर व सांगली संघांची विजयी सुरुवात