पुणे (19 मार्च 2024) – आज शेवटचा सामना मुंबई शहर विरुद्ध सांगली यांच्यात झाला. अ गटात मुंबई शहर चौथ्या क्रमांकावर तर ब गटात सांगली संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. सांगलीच्या तुषार खडके ने 2 गुणांची चढाई करत सांगली संघाचा खात उघडला. तर मुंबई शहराच्या राज आचार्य ने 2 गुण मिळवत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. सांगलीच्या तुषार खडके, अभिराज पावर व अभिषेक गुंगे यांनी चतुरस्त्र साध्या करत मुंबई शहरला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
सांगली संघाला मुंबई शहर कडून राज आचार्य एकटा लढत देत होता. सांगली चे 3 चढाईपटू विरुद्ध मुंबई शहरचा राज आचार्य अशी चुरशीची लढत बघायला मिळत होती. 13 मिनिटाच्या खेळानंतर पहिल्यांदा सांगली बचावपटूला पहिला गुण मिळाला. मुंबई शहरच्या तुषार शिंदे राज आचार्य ला चांगली साथ देत सामन्यात चुरस वाढवली. मात्र सांगलीच्या अभिराज पवार व तुषार खडके यांनी चपळाई खेळ करत आपली आघाडी वाढवत ठेवली. राज आचार्य ने मध्यांतरा पूर्वी सुपर रेड करत पिछाडी कमी केली. मध्यंतराला सांगली कडे 25-19 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरांतर सांगली संघाने ऑल आऊट करत आघाडी मिळवली होती परंतु मुंबई शहराच्या राज आचार्य ने 4 गुणांची सुपर रेड केली. पुढील 2 चढायां मध्ये सांगली संघाला ऑल आऊट करत सामन्यात चुरस आणली.
सामन्याची शेवटची आठ मिनिटं शिल्लक असताना सामना 38-38 असा बरोबरीत होता. त्यानंतर सांगलीच्या तुषार खडके व अभिराज पवारच्या आक्रमक चढायांनी सांगली संघाने उत्तरार्धात मुंबई शहरला ऑल आऊट करत निर्यायक आघाडी मिळवत सामना आपल्या बाजूने केला. सांगली ने सामना 53-42 असा जिंकला. सांगली कडून चढाईत अभिराज पवार ने 16, तुषार खडके व अभिषेक गुंगे यांनी प्रत्येकी 11 गुण मिळवले. नवाज देसाई ने पकडीत एकूण 4 गुण मिळविले. पण संपूर्ण सामन्यात मुंबई शहरच्या राज आचार्य ने जबरदस्त 30 गुणांची खेळी करत आपली छाप पाडली त्यात 4 सुपर रेडचा सुद्धा समावेश होता. पण राज आचार्यची ही खेळी त्यांचा संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडली. (Sangli’s victory in the promotion round, Mumbai City’s Raj Acharya’s innings in vain)
बेस्ट रेडर- राज आचार्य, मुंबई शहर
बेस्ट डिफेंडर- नवाज देसाई, सांगली
कबड्डी का कमाल – राज आचार्य, मुंबई शहर
महत्वाच्या बातम्या –
चाहत्यांचा हर्टब्रेक! आयपीएल 17व्या हंगामाबाबत सूर्यकुमारचे संकेत, नक्की ‘या’ पोस्टमागं दडलंय काय?
CSK vs RCB सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची? तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या सर्वकाही