भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलनं शुक्रवारी एक आनंदाची बातमी दिली. राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर एकत्र पोस्ट टाकून ही माहिती दिली. आथिया प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. या दोघांचं लग्न 2023 मध्ये झालं होतं. मात्र त्यापूर्वी ते अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. त्यांची पहिली भेट एका मित्राच्या मदतीनं झाली होती. पहिल्याच भेटीत राहुल आणि अथिया यांच्यात एक खास कनेक्शन बनलं होतं. त्यानंतर थायलंडमध्ये नवीन वर्ष साजरे करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
अथिया सांगते की, तिचं व्यक्तिमत्त्व राहुलपेक्षा खूप वेगळं आहे. मात्र एकमेकांबद्दल असणारा आदर यामुळे अथिया आणि राहुल एकमेकांना आवडू लागले. अथिया शेट्टीनं एकदा हेही सांगितलं होतं की, केएल राहुलची मानसिकता खूप सकारात्मक आहे. राहुलचा हा स्वभाव तिला खूप आवडतो. यामुळे तिची विचार करण्याची पद्धतही बदलली आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर पार पडला. आता या जोडप्यानं ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या घरी पुढील वर्षी नव्या पाहुण्याचं आगमन होईल. आता बाळाच्या आगमनानंतर केएल राहुलचं करिअर पुन्हा एकदा उभारी घेऊ शकेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
गुड न्यूज! स्टार भारतीय फलंदाजाच्या घरी लवकरच पाळणा हलणार, बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी आनंदाची बातमी
ऑस्ट्रेलियात भारतीय संघावर अन्याय, अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमवावा लागेल?
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळू शकते संधी