पुणे, 19 मार्च 2024: हॉकी मणिपूरने हॉकी उत्तराखंडवर 11-2 असा सहज पराभव करताना सलग तिसर्या विजयासह सलग पूल जीमधून 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली. आता बाद फेरीत त्यांची गाठ हॉकी महाराष्ट्रशी पडेल. क्वार्टरफायनल फेरी बुधवारपासून खेळली जाणार आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या हॉकी मणिपूरने मंगळवारी हॉकी उत्तराखंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ब्रम्हचारीमायुम सरिता देवीचे (आठव्या आणि 24व्या मिनिटाला) मैदानी गोल, प्रभलीन कौरचे (14 आणि 45व्या मिनिटाला, पीसी) पेनल्टी कॉर्नरवरील आणि चिंगशुभम संगई इबेनहाईचे (53व्या आणि 60व्या मिनिटाला, पीसी) एका पेनल्टी कॉर्नरसह दोन गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
हॉकी मणिपूरचा पूल जीमधून सलग तिसरा विजय आहे. त्यांनी एकूण 9 गुणांसह आरामात बाद फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवणारा तो आठवा आणि शेवटचा संघ ठरला.
पूल जीमधील इतर सामन्यामध्ये, हॉकी कर्नाटकने दादरा नगर आणि हवेली आणि दीव आणि दमन हॉकीचा 13-0 असा धुव्वा उडवला. कृतिकाचे (15, 26व्या मिनिटाला-पीसी, 56व्या मिनिटाला-पीसी, 56व्या मिनिटाला-पीसी) चार गोल करताना त्यात सिंहाचा वाटा उचलला. एम. जी. याशिकाने (20व्या मिनिटाला-पीसी, 38व्या मिनिटाला, 58व्या मिनिटाला-पीसी) तीन गोल करताना तिला चांगली साथ दिली.
पूल एचमध्ये हॉकी हिमाचल आणि हॉकी राजस्थान यांच्यातील लढत 4-4 अशी बरोबरीत सुटली. हॉकी हिमाचलकडून धापा देवीने चौथ्या आणि 49व्या मिनिटाला असे दोन गोल केले. रितू आणि भूमिका चव्हाणने प्रत्येकी दोन गोल केले. हॉकी राजस्थानकडून रीना सैनीने 41 आणि 48व्या मिनिटाला तसेच बलवंत रीना कंवरने 25व्या आणि 40व्या मिनिटाला गोल करताना प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
निकाल –
पूल-एफ: हॉकी हिमाचल: 4(धापा देवी चौथ्या, 49व्या मिनिटाला-पीसी; रितू 17व्या मिनिटाला, भूमिका चौहान 53व्या मिनिटाला) बरोबरी हॉकी राजस्थान: 4 (बलवत रीना कंवर 25व्या मिनिटाला-पीसी, 40व्या मिनिटाला; रीना सैनी 41व्या मिनिटाला, 48व्या मिनिटाला). हाफ टाईम: 2-1
पूल-जी: हॉकी कर्नाटक: 13(कृतिका एसपी 15व्या मिनिटाला, 26व्या मिनिटाला – पीसी., 56व्या मिनिटाला-पीसी, 56व्या मिनिटाला-पीसी. एम. जी. याशिका 20व्या मिनिटाला पीसी; 38व्या मिनिटाला, 58व्या मिनिटाला-पीसी; चंदना जे. 33व्या मिनिटाला, 37व्या मिनिटाला-पीसी; अदिरा एस 43व्या मिनिटाला; प्रशु संघ परिहार 48व्या मिनिटाला, अंजली एच. आर. 55व्या मिनिटाला; गेडेला गायत्री 60व्या मिनिटाला) विजयी वि. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हॉकी: 0. हाफ टाईम: 3-0
पूल-जी: मणिपूर हॉकी: 11(वर्तिका रावत 5व्या मिनिटाला; क्षेत्रिमायुम सोनिया देवी सातव्या मिनिटाला सातव्या; ब्रम्हचारीमयुम सरिता देवी आठव्या मिनिटाला, 24व्या मिनिटाला; प्रभलीन कौर 14वी-पीसी, 45-पीसी; सनासम रंजिता 44व्या मिनिटाला; चिंगशुभम संगई इबेनहाई 53व्या मिनिटाला; 60व्या मिनिटाला-पीसी; लिली चानू मतेंगबम 57व्या मिनिटाला, चानू लचेंबी खुंद्रकपम 59व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी उत्तराखंड: 2 (कोमल धामी 36व्या मिनिटाला; मोनिका चंद 41व्या मिनिटाला). हाफ टाईम: 5-0. (Hockey Manipur in the final eight with three consecutive wins)
बुधवारचे सामने
उपांत्यपूर्व फेरी-1: हॉकी मध्य प्रदेश वि. हॉकी पश्चिम बंगाल – दु. 2.00 वा
उपांत्यपूर्व फेरी-4: हॉकी हरियाणा वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा – सायं. 4.00 वा.
उपांत्यपूर्व फेरी-3: हॉकी झारखंड वि. हॉकी मिझोराम – सायं. 6.00 वा.
उपांत्यपूर्व-2: हॉकी महाराष्ट्र वि. हॉकी मणिपूर – रा. 8.00 वा.
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार यादव पहिला सामना खेळला नाही तर कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11? जाणून घ्या
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा सलग दुसरा विजय