सूर्यकुमार यादवचा टी20 विश्वचषाकतील तो झेल कोणताही भारतीय चाहता विसरू शकत नाही. ज्याने भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने मारलेल्या तो शाॅट सर्वांनाच षटकरच वाटलेला पण परंतु सूर्याच्या झेलने कर्णधारासह सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. असे असूनही, आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये रोहित शर्माने भारताच्या टी20 विश्वचषक विजयाचे मुख्य कारण सूर्या नव्हे तर रिषभ पंतला म्हटले आहे.
रोहित शर्माने टी 20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात झालेल्या अनेक प्रसंगाच्या मानसिकतेबद्दल सांगितले. तो म्हणाला, “अंतिम सामन्यात रिषभ पंतच्या धोरणात्मक विचाराने आमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिकेला 24 चेंडूत 26 धावांची गरज असताना, सामना काही क्षणांसाठी थांबवण्यात आला. पंतने वेळेचा योग्य वापर करून समोरील संघाचे लक्ष विचलित केले. त्या घटनेनंतर (रिषभ पंतच्या) सामना खूप स्लो झाला. परिणामी फलंदाजांची लय मोडली. त्याचाच फायदा संघाला झाला.
सामन्यात एके काळी दक्षिण आफ्रिकेने 13 षटकांत 109 धावा केल्या होत्या आणि संघाला 7 षटकांत 69 धावांची गरज होती. त्यानंतर 14व्या षटकात कुलदीप यादवच्या षटकात डेव्हिड मिलरने 14 धावा दिल्या, तर पुढच्याच षटकात अक्षर पटेलच्या षटकात हेनरिक क्लासेनने 24 धावा ठोकल्या. त्यामुळे सामन्याचा कल पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेकडे गेला. पण पंतने घेतलेल्या ब्रेकनंतर धावगती बरीच कमी झाली. त्याआधी संघाने केवळ 2 षटकांत 38 धावा खेचल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला शेवटच्या 4 षटकांत केवळ 17 धावा करता आल्या.
हेही वाचा-
ind vs ban; मालिकेतील पहिल्याच सामन्यात पावसाच सावटं? मॅचपूर्वी पाहा हवामान अंदाज
4 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या रैनानं शाकिबला धो-धो धुतलं, मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी; VIDEO पाहा
आयपीएलमध्ये विकले गेले 5 सर्वात महागडे भारतीय खेळाडू, युवराज सिंगचा रेकॉर्ड आजपर्यंत अतूट






