Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मर्फीची चालली जादू! तब्बल नऊ वर्षानंतर ऑस्ट्रेलियासाठी केली कोणीतरी अशी कामगिरी

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/CA

Photo Courtesy: Twitter/CA


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दोन दिवशी उत्कृष्ट कामगिरी करण्यात अपयशी ठरला. मात्र, पदार्पण करणारा फिरकीपटू टॉड मर्फी याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच बळी मिळवले. यासह ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहास आणि एक खास कामगिरी करून दाखवली.

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 177 धावांवर संपवला. ‌‌ त्यानंतर रोहित शर्मा ने आक्रमक अर्धशतक झळकावत पहिला दिवस संपूर्णपणे भारताच्या नावे केला होता. मात्र, दिवसाच्या अगदी अखेरीस पदार्पण करणाऱ्या मर्फी याने केएल राहुलला बाद करत स्वतःचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. दुसऱ्या दिवशी देखील त्याने सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विन व चेतेश्वर पुजारा यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर लंचनंतर पहिल्याच चेंडूवर त्याने विराट कोहली याला बाद करत मोठे यश मिळवले. त्यानंतर भरत याला बाद करत त्याने आपला पाचवा बळी टिपला.

यासोबतच मर्फी हा पदार्पणात ऑस्ट्रेलियासाठी पाच बळी मिळवणारा 17 वा गोलंदाज ठरला. तर अशी कामगिरी करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनरही बनला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये 2014 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियासाठी कोणत्याही गोलंदाजाने पदार्पणात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली. अखेरच्या वेळी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने पदार्पणात पाच बळी मिळवले होते.

मर्फी याच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीचा आढावा घेतल्यास 22 वर्षाच्या मर्फी याने आपल्या क्रिकेटची सुरुवात मध्यम गती वेगवान गोलंदाज म्हणून केली होती. मात्र, पाच वर्षांपूर्वी त्याने फिरकीपटू होण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्टोरिया संघासाठी खेळताना त्याने 6 सामन्यात 29 बाई टिपले होते. तसेच बिग बॅश लीगमध्ये तो सिडनी सिक्सर्स संघाचा भाग होता. ‌

(Todd Murphy Fifer In Test Debute It Happens For Australia After 2014)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…


Next Post
Rohit-Sharma-Century

ओपनर म्हणून कशीये रोहितची आकडेवारी? प्रत्येक चाहत्याने जाणून घेतलीच पाहिजे पठ्ठ्याची कामगिरी

Photo Courtesy: Twitter/BCCI

दुसरा दिवस रोहित-जडेजाच्या नावे! नागपूर कसोटीत टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी, मर्फीची एकाकी झुंज

Photo Courtesy: Twitter

बॉल टॅम्परिंगविषयी बोलणाऱ्या मायकल वॉनला रवी शास्त्रींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले वाचाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143