गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त कारनामा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरे स्थान पटकावले आहे. चला तर जाणून घेऊया रोहितने नेमका काय विक्रम केला आहे.
झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलिया संघ संघर्ष करताना दिसला. त्यांच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाने यावेळी 63.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 177 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाकडून फलंदाजी करण्यासाठी सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) हे धुरंधर उतरले.
रोहित शर्माचा कारनामा
यावेळी केएल राहुलने 71 चेंडू खेळत 20 धावा केल्या आणि तो टॉड मर्फी टाकत असलेल्या 23 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गोलंदाजाच्या हातूनच झेलबाद झाला. मात्र, दुसऱ्या बाजूने रोहितने धावफलक हलता ठेवला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रोहित मैदानावर टिकून राहिला. त्याने यावेळी 69 चेंडूंचा सामना करताना 56 धावा केल्या. तसेच, अर्धशतकही पूर्ण केले. हे त्याचे 15वे कसोटी अर्धशतक होते. रोहितने यावेळी 1 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला. यावेळी रोहितची सरासरी ही 81.15 इतकी होती.
FIFTY!
A well made half-century for #TeamIndia Captain @ImRo45 ????????
His 15th in Test cricket.
Live – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/31VHpUbmcp
— BCCI (@BCCI) February 9, 2023
डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत रोहित
यामुळे घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा याच्या नावाचीही नोंद झाली. घरच्या मैदानावर कसोटीत कमीत कमी 30 डावात खेळताना रोहितची सरासरी 75.66 इतकी आहे. या यादीत अव्वलस्थानी सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) आहेत. त्यांची कमीत कमी 30 डावातील घरच्या मैदानावरील कसोटीतील सरासरी ही 98.22 इतकी आहे. याव्यतिरिक्त यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) आहे. त्याची सरासरी 70.50 इतकी आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज क्लायड वालकॉट यांचाही या यादीत समावेश असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची घरच्या मैदानावर कमीत कमी 30 डावात फलंदाजी करतानाची सरासरी ही 69.83 इतकी राहिली आहे. (4 cricketers who has Highest Test Average at Home read here)
घरच्या मैदानावरील कसोटी खेळताना सर्वाधिक सरासरी असणारे खेळाडू
98.22 सरासरी- सर डॉन ब्रॅडमन
75.66 सरासरी- रोहित शर्मा*
70.50 सरासरी- मार्नस लॅब्युशेन
69.83 सरासरी- क्लायड वालकॉट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल
पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा’






