गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आणला. रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या भारताच्या प्रमुख फिरकीपटूंनी मिळून आठ बळी टिपले. मात्र, हा सामना सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ चांगलाच भडकला.
ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात कशी प्लेइंग इलेव्हन खेळवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. नाणेफेकी वेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपला संघ जाहीर केला तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण, सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेला डावखुरा फलंदाज ट्रेविस हेड याला या संघात जागा मिळाली नव्हती. याच कारणामुळे वॉ निराश झालेला दिसला. एक इंस्टाग्राम पोस्ट करत तो म्हणाला,
‘या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे की, जगातील चौथ्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा मागील वर्षभरातील सर्वोत्तम फलंदाज संघात नाही. तो तुम्हाला ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करून देतो. चला पाहूया ऑस्ट्रेलियन निवड समिती खरंच किती हुशार आहे.’
नागपूरची खेळपट्टी डावखुऱ्या फलंदाजांना तितकी अनुकूल नाही अशी बातमी सामन्याच्या आधी येत होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघात पीटर हॅंड्सकॉम्ब याचा समावेश केला गेला. तर, भारतात खेळण्याचा अनुभव असल्याने डावखुऱ्या मॅट रेनशॉ याला देखील संधी मिळाली.
हेड याने चालू हंगामात तब्बल 87.50 च्या शानदार सरासरीने 525 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, भारतीय उपखंडातील त्याची आतापर्यंतची कामगिरी तितकी समाधानकारक नाही. भारतीय उपखंडातील 7 कसोटी सामन्यांमध्ये तो केवळ 213 धावा करू शकला होता.
(Steve Waugh Angry After Dropping Travis Head For First Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत