क्रीडाविश्वात दररोज काही ना काही घडत असते. कुठला तरी खेळाडू मोठा विक्रम रचतो, तर कुणीतरी खळबळजनक विधान करतं. तसेच, काहीजण असे काही बोलून जातात, ज्याची कुणालाही कल्पनाही नसते. अशात पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने मोठा खुलासा केला आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रिझवान याने म्हटले आहे की, न्यूझीलंड कसोटीदरम्यान त्याने प्रशिक्षक आणि कर्णधाराला म्हटले होते की, त्याला संघाबाहेर करून टाका. त्याच्यानुसार, त्यानेच सरफराज अहमद याचे बदली खेळाडू म्हणून नाव सुचवले होते.
‘मी म्हणालो की, मला संघाबाहेर करा’
मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा स्वत: म्हणाला होता की, त्याला अंतिम अकरा खेळाडूंमधून बाहेर काढून सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला संधी दिली जावी. क्रिकेट पाकिस्तानसोबत बोलताना तो म्हणाला की, “तुम्ही मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांना विचारू शकता की, मी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीनंतर काय म्हणालो होतो. सरफराज अहमदने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर मी खुश होतो. मलाही तेच हवे होते. मला वैयक्तिकरीत्या वाटते की, मी चांगली कामगिरी करू शकत नव्हतो आणि पुढील मालिकेत माझी जागाही बनत नाहीये. काही खेळाडूंचे असे म्हणणे आहे की, प्रत्येक खेळाडू या काळातून जातो. तू काही सामन्यात अपयशी झाल्यामुळे बाकावर बसू शकत नाही.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी प्रशिक्षक आणि कर्णधाराला स्वत: म्हणालो, तुम्ही मला ड्रॉप करू शकता. कारण, मी चांगली कामगिरी केली नाहीये. दोन खेळाडू आहेत, ज्यांना याविषयी माहिती आहे. सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामुळेच त्याला संधी मिळाली पाहिजे होती. त्यामुळे सरफराजला चांगली कामगिरी करताना पाहून मी खुश होतो.”
खरं तर, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा पूर्णत: फ्लॉप होता. त्यामुळे त्याला बाहेर काढून सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य सिद्ध केला होता. सरफराजने त्याच्या पुनरागमनानंतर जबरदस्त कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. (mohammad rizwan shocking revelation said i himself asked the captain and coach to drop me from playing xi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूचे झाले नव्हते ‘असे’ पदार्पण, सूर्याने कसोटी कॅप मिळताच रचला विक्रम
फेल राहुल! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटीतही राहुलच्या बॅटमधून आटल्या धावा, पहिल्या डावात अपयशी