---Advertisement---

भारतीय संघात पुनरागमनासाठी सूर्यकुमार यादवची कंबर कसून मेहनत; म्हणाला, ‘सर्व काही ठीक राहिले तर…

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026 8:21 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागील काही काळापासून संघातून बाहेर आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेचा अंतिम सामनाच त्याच्यासाठी शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि संघातूनही वगळण्यात आले. आता सूर्याने पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली आहे.

सूर्यानंतर श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या बदलामुळे सूर्यकुमारचे संघात पुनरागमन होणे अत्यंत कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जरी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला असला, तरी त्याची वैयक्तिक कामगिरी खूपच खराब राहिली होती. याच कारणामुळे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर त्याला संघातून ड्रॉप करण्यात आले.

एका कार्यक्रमादरम्यान मीडियाशी बोलताना सूर्या म्हणाला, “बघा, मी पूर्ण मेहनत करत आहे. जर सर्व काही ठीक राहिले, तर चांगलेच होईल.”
सूर्याने टी-20 विश्वचषकिकेत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली, पण फलंदाज म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने 9 सामन्यांच्या 9 डावांत 242 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 136.72 चा होता. जरी ही आकडेवारी बघून त्याची कामगिरी वाटत असेल, तर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आणि मोठ्या संघांविरुद्ध सूर्या फ्लॉप ठरला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला होता. आता सूर्याचे भारतीय संघात पुनरागमन होते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या म्हणजेच 2026 च्या आयपीएलमध्येही सूर्याची कामगिरी फ्लॉप राहिली. त्याने हंगामातील 13 सामन्यांच्या 13 डावांत फलंदाजी करताना 20.76 च्या सरासरीने 270 धावा केल्या. या दरम्यान त्याने केवळ 2 अर्धशतके झळकावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---