गुरुवारपासून (दि. 09 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. नागपूर येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा संघ 177 धावांवर ढेपाळला. भारताकडून धारदार गोलंदाजी करत मोहम्मद सिराज याने पाहुण्या संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला तंबूत धाडले. तसेच, संघाला शानदार सुरुवात करून दिली. मात्र, विकेट घेताच सिराजला जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा जास्त आनंद कर्णधार रोहित शर्मा आणि स्टेडिअममध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना झाली.
रोहित-राहुल यांची शानदार रिऍक्शन
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा डावातील दुसरे, तर स्वत:चे पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. सिराजने पहिल्याच चेंडूवर योग्य लेंथ आणि लाईनसोबत चेंडू फेकला, जो थेट उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या पॅडला जाऊन लागला. त्यानंतर सिराजसोबत संपूर्ण संघाने जोरदार अपील केली आणि पंचांनाही बोट वर केले.
पंचांनी ख्वाजाला बाद घोषित करताच ख्वाजा याने रिव्ह्यू घेतला. मात्र, रिव्ह्यूमध्ये चेंडू थेट स्टंपला लागताना दिसत होता. अशात तिसऱ्या पंचांनीही मैदानातील पंचांचा निर्णय कायम ठेवला. ख्वाजाला बाद घोषित करताच, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
राहुल द्रविड़ और रोहित के रिएक्शन ने दिल जीत लिया #INDvsAUS #RohitSharma #RahulDravid pic.twitter.com/k0owm8qZ2Z
— binu (@binu02476472) February 9, 2023
ऑस्ट्रेलिया 177 धावांवर तंबूत
नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघ भारतीय गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला 177 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून एकाही फलंदाजाला 50 धावा करता आल्या नाहीत. मार्नस लॅब्यूशेन याने 49 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऍलेक्स कॅरे (36), पीटर हँड्सकाँब (31) यांनीही खारीचा वाटा उचलला.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 22 षटके टाकताना 47 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आर अश्विन याने 3, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनाही प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. (pacer mohammed siraj wicket usman khawaja rohit sharma rahul dravid gave a happy reaction see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी
अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट घेताच नावावर झाला मोठा विक्रम, बनला दुसरा भारतीय