---Advertisement---

अर्रर्र.. लाजच घालवली! फायनल मॅचमध्ये टार्गेट 230 धावांचं, पण टीम अवघ्या 16 रन्सवर ऑलआऊट

Bat Ball
---Advertisement---

तुम्ही टी-20 क्रिकेटमध्ये अनेकदा आश्चर्यकारक सामने पाहायला मिळतात. कधी कुणी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा पराक्रम करत. तर कधी कुणी एका ओव्हरमध्ये विकेटचा चौकार मारत. मात्र आता क्रिकेट विश्वात एका संघाने अक्षरश: कहर केला आहे. तसेच टी-20 लीगच्या फायनल सामन्यात 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 16 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या अर्ध्या फलंदाजांनी खातेही उघडले नाही. अंतिम सामन्यात अशा लाजिरवाण्या पराभवामुळे संघाने अनेक नकोसे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

याबरोबरच, टी-20 क्रिकेटमध्ये हा नकोसा विक्रम झिम्बाब्वेमध्ये T20 क्रिकेट लीगमध्ये घडला आहे. तसेच टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये एक संघ 10 धावांवरही ऑलआऊट झाला आहे. तर झिम्बाब्वे डोमेस्टिक टी20 लीगच्या अंतिम सामन्यात डरहम आणि मॅशोनालँड ईगल्सचे संघ आमनेसामने होते. तर या सामन्यात डरहमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डरहमने 20 षटकांत 6 गडी गमावून 229 धावा केल्या होत्या.

त्यानंतर हा सामना जिंकण्यासाठी डरहमने दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मॅशोनालँड ईगल्सचा संपूर्ण संघ अवघ्या 16 धावांवर गारद झाला. मॅशोनालँड ईगल्स संघाला 8.1 षटकात केवळ 16 धावा करता आल्या. फलंदाजी करताना मॅशोनालँड ईगल्सच्या 5 खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. याशिवाय संपूर्ण संघातील एकाही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर यावेळी मॅशोनालँड ईगल्सकडून कर्णधार चामू चिभाभाने सर्वाधिक 4 धावा केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/C4ThyJliCJB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, T20 क्रिकेटमध्ये आयल ऑफ मॅन संघाच्या नावावर सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट होण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे. तर हा संघ अवघ्या 10 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरचा संघही 15 धावांत ऑलआऊट झाला होता. तसेच सिडनी थंडर संघ 15 धावांवर ऑलआऊट झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---