इंग्लंडचा भारत दौराक्रिकेटटॉप बातम्या

IND Vs ENG : भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने शेअर केला एक अनोखा फोटो

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाच्या विजयाने संपली आहे. भारताने या मालिकेत इंग्लिश संघाचा 4-1 असा पराभव केला. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लिश संघाला एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला आहे. तसेच आता पुढील काही महिने टीम इंडियासाठी कोणताही सामना किंवा मालिका खेळणार नाही. भारतीय संघाचे सर्व खेळाडू तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा मैदानावर ॲक्शनमध्ये पहायला मिळणार आहेत.  याआधी सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांकडून खेळताना दिसणार आहेत.

याबरोबरच भारतीय संघाने 112 वर्षांनंतर एक मोठा विक्रम केला आहे. त्यानंतर भारतीय कर्णधाराने मालिका जिंकल्यानंतर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कॅप्टन रोहितसोबत यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल पहायला मिळत आहेत. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहितने लिहिले आहे, ‘गाईज रोमिंग इन गार्डन.

तसेच रोहित शर्माच्या कर्णधारपदावर अनेकवेळा सहकारी खेळाडू आणि माजी खेळाडूं विधान करत असतात. तसेच रोहित हा वेगळ्या प्रकारचा कर्णधार असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. तो मैदानात अतिशय कडक असला तरी, तो विनोद आणि मजेदार वातावरण संघामध्ये निर्माण करत असतो. तसेच तो ड्रेसिंग रूममध्येही तो खूप विनोदी वातावरण ठेवत असतो. त्यामुळे भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. याच कारणामुळे भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 ने सहज जिंकली आहे.

https://www.instagram.com/p/C4TECcqPqAV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली कसोटी मालिका खूपच मनोरंजक झाली आहे. तर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारतीय संघाविरुद्ध दमदार विजयाने सुरुवात केली होता. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles