---Advertisement---

WPL 2024 : ‘करो या मरो’ सामन्यात गुजरात जायंट्सने टॉस जिंकूण घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग 11

---Advertisement---

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना खेळला जात आहे. तर हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापूर्वी गुजरात जायंट्स संघाने चार सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवला आहे. मुंबई इंडियन्स संघानेही शेवटच्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत चौथा विजय नोंदवला आहे.

याबरोबरच  हा सामना जिंकून गुणतालिकेत टॉपला राहण्याची मुंबई इंडियन्सची धडपड असेल. तर गुजरात जायंट्सला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. गुजरातने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आम्हीही प्रथम फलंदाजी निवडली असती असं मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं. “आम्ही देखील प्रथम फलंदाजी केली असती. आता आम्हाला चांगली गोलंदाजी करणं भाग आहे आणि आशा आहे की आम्ही त्यांना कमी धावांवर रोखू. आमच्यासाठी हा महत्त्वाचा खेळ आहे. आम्हाला चांगली कामगिरी करून त्यांच्यावर दबाव आणायचा आहे. आमच्या संघात कोणतेही बदल नाहीत.”, असं हरमनप्रीत कौर हीने सांगितलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर/कर्णधार), फोबी लिचफिल्ड, ॲशलेग गार्डनर, दयालन हेमलता, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम शकील.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---