---Advertisement---

Video : बाबर आझमनं कॉपी केलं विराटचं सेलिब्रेशन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीगचा 25 वा सामना शुक्रवारी (8 मार्च) पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पेशावर जाल्मीनं 76 धावांनी मोठा विजय नोंदवला. पेशावरकडून या सामन्यात बाबर आझमनं शानदार खेळी केली. त्यानं 30 चेंडूत 53 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाबरनं एक खास सेलिब्रेशन केलं, जे पाहून सर्वांना विराट कोहलीच्या सेलिब्रेशनची आठवण झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बाबर आझमचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये तो विराट कोहलीप्रमाणे सेलिब्रेशन करताना दिसतोय. व्हिडिओत बाबर विराट कोहलीप्रमाणे त्याच्या गळ्यातील लॉकेटचं चुंबन घेताना दिसला. या सामन्यात बाबर सलामीला आला होता. आपल्या 53 धावांच्या खेळीत त्यानं 9 चौकार आणि 1 षटकार मारला. बाबरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पेशावरनं 193 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्वेटा संघ केवळ 120 धावाच करू शकला.

 

बाबर आझम पाकिस्तान सुपर लीगमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्यानं संपूर्ण मोसमात आतापर्यंत 400 हून अधिक धावा केल्या आहेत. बाबरनं आतापर्यंत 8 सामन्यात 447 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली. 111 ही बाबरची सर्वोच्च धावसंख्या आहे, जी त्यानं इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध केली होती. आगामी टी 20 विश्वचषकापूर्वी बाबरचा हा फॉर्म पाकिस्तान क्रिकेट संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तो त्याच्या संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे.

बाबर आझमनं काही दिवसांपूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला होता. बाबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) हा विक्रम केला. बाबर आझमनं टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 271 डाव घेतले. या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे होता. त्यांनं 285 डावात हा जादुई आकडा गाठला होता.

इतर बातम्या-

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान; श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा

Video : ग्लेन फिलिप्सचा हा झेल पाहून क्रिकेटविश्व हैराण! तुम्हीही एकदा पाहाच

रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---