भारतीय संघाने पाचव्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करत 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा संघाने अनेक दिग्गजांच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. तसेच भारतीय कसोटी संघातील हेच युवा खेळाडू मैदानावरील कामगिरीसोबतच स्लेजिंगमध्ये देखील मागे राहिले नाहीत.
सध्या सर्फराज खानने ते विराट कोहलीचाच वारसा पुढे चालवला असून भारताच्या ध्रुव जुरेल, शुभमन गिल आणि सर्फराज खानने जॉनी बेअरस्टोला चांगलेच शाब्दिक फटके दिले आहेत. याचा सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
फलंदाजीला आल्यानंतर जॉनी बेअरस्टोने स्लिपमध्ये असलेला शुभमन गिल विकेटकिपर ध्रुव जुरेल आणि शॉर्ट लेगला उभा असलेला सर्फराज खान यांनी बेअरस्टोची चांगलीच खेचली आहे. तर यावेळी जॉनी बेअरस्टो शुभमन गिलला म्हणाला की, जिमीने (अँडरसन) ला तुला कंटाळा येत असल्याबद्दल काही सांगितलं आणि त्याने तुला बाद केलं ना? त्यावर गिल म्हणाला की, ‘म्हणून काय झालं ते माझ्या शतकानंतर झालं तू किती धावा केल्या आहेस इथं? गिल आणि बेअरस्टोच्या शाब्दिक वादात शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या सर्फराज खानने देखील उडी घेतली. तो हिंदीत म्हणाला की, ‘थोड्या धावा काय केल्या जास्तच उड्या मारत आहे.’
याबाबत भारतीय खेळाडू ध्रुव जुरेलने सामना संपल्यानंतर समालोचकाच्या मुलाखतीदरम्यान खेळाडूने याचा खुलासा केला. समालोचक आकाश चोप्राने जुरेलला विचारले की मैदानावर काय चालले आहे. यावर जुरेल म्हणाले की, ‘हा वाद नव्हता, ते फक्त एकमेकांचा आनंद घेत होते. तो म्हणाला की ही फक्त मजा आहे, प्रकरण काही मोठे नाही. ज्युरेलने नुसती गंमत सांगून हा वाद टाळला असला तरी व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र वातावरण चांगलेच वादग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
https://twitter.com/astro_talee/status/1766368541496733908
दरम्यान, जॉनी बेअरस्टोने दुसऱ्या डावात 31 चेंडूत 39 धावा केल्या. त्याची ही 100 वी कसोटी होती. त्याने जो रूटसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. त्याने अश्विनला तीन षटकार मागले. मात्र त्याची शिकार कुलदीप यादवनेच केली आहे. तसेच बेअरस्टोला यंदाच्या मालिकेत फार चमकदार कामगिरी करता आली नाही. तो आक्रमक खेळला मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गिलची छेड काढली अन् या शाब्दिक बाचाबाचीत त्याची एकाग्रता भंगली. त्याचा फटका त्याला अन् संघाला देखील बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-