---Advertisement---

पाकिस्तानच्या विजयाच्या आशांवर पाणी! दुसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

On: सोमवार, मार्च 31, 2025 8:23 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 73 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ज्यामुळे ते मालिकेत 0-1 पिछाडीवर आहेत. आता पाकिस्तान संघाला मालिकेत बराबरी करायची असल्यास त्यांना दुसरा वनडे सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल, नाहीतर ते मालिका गमावतील.

पण दुसऱ्या वनडे सामन्याआधी पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. संघाचा स्टार खेळाडू उस्मान खान दुखापती झाला आहे, त्यामुळे पुढच्या सामन्यात तो खेळणार नाही. यामुळे पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, उस्मान खानला मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे. त्याला न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. एमआरआय स्कॅन मध्ये सांगितले आहे की, त्याची दुखापत जास्त गंभीर नाही. पण तो पुढचा सामना तरीही खेळू शकणार नाही.

उस्मान खानने न्यूझीलंड विरुद्ध वनडे मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने चांगली सुरुवात केली, पण तो मोठी पारी खेळू शकला नाही. त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 39 धावा केल्या होत्या. आता त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या वनडे सामन्यात इमाम उल हक याला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. इमामला पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती पण आता दुसऱ्या सामनात त्याला संधी मिळू शकते.

उस्मान खानने जरी आता एकच वनडे सामना खेळला असला तरीही याआधी त्याने पाकिस्तानसाठी 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यातही त्याने एकूण 239 धावा केल्या होत्या आणि एक अर्धशतक सुद्धा झळकावले होते.

न्यूजीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी पाकिस्तान संघ:-
इमाम-उल-हक, बाबर आजम, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक, कर्णधार),अब्दुल्ला शफीक, सलमान आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अशरफ, इरफान खान, अबरार अहमद, नसीम शाह, मोहम्मद वसीम जूनियर, आकिफ जावेद, मोहम्मद अली, सुफियान मुकीम, हारिस रऊफ,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---