भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 ने दणदणीत मालिका विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने मालिकेत अनेक प्रयोग केले, ज्यात सर्वात मोठा सकारात्मक अनुभव ठरला ईशान किशन. किशनला मालिकेसाठी आणि टी20 वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये प्रारंभिकरित्या बॅकअप विकेटकीपर म्हणून जागा मिळाली होती. मात्र, तिलक वर्माच्या दुखापतीमुळे किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. त्याने त्या संधीला दोन्ही हातांनी धरले.
ईशान किशनने मालिकेत दमदार आणि आक्रमक फलंदाजी केली. त्याने फक्त धावाच नाही केल्या, तर त्याने संघासाछी मोठी निर्णयात्मक भुमिका मांडली. त्याच्या रेड हॉट फॉर्ममुळे आता टीम मॅनेजमेंट त्याला प्लेइंग इलेव्हनबाहेर करण्याचा विचार करणार नाही, आणि त्यामुळे पुढील सामन्यांसाठी संघात कोणाचे स्थान धोक्यात येईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेट चर्चांमध्ये असे सांगितले जात आहे की संजू सॅमसनचा स्थान धोक्यात आहे. न्यूझीलंडविरुद्ध संजू सॅमसने अपेक्षित कामगिरी केली नाही; पाच सामन्यांत त्याने 50 पेक्षा कमी धावा केल्या. ईशान किशनने अंतिम टी20मध्ये शतक ठोकल्यावर विकेटकीपिंगही केली, ज्यामुळे संजूचा दबाव वाढला.
कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, मालिकेपूर्वीच ठरवले होते की संजू सॅमसन पहिल्या तीन सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करेल आणि ईशान किशनला अंतिम दोन सामन्यांमध्ये संधी मिळेल. पाचव्या सामन्यात जरी टीम शीटमध्ये संजूच्या नावासमोर विकेटकीपर लिहिलेले असले, तरी ईशानला खेळवण्याचा निर्णय पूर्वनिश्चित होता.
सूर्यकुमारने ईशानच्या खेळीबद्दल बोलताना सांगितले की, संघाला किशनच्या स्किल्सची पूर्ण माहिती आहे. त्याने त्याचा गेम बदलण्याची गरज नव्हती. किशनला “गेम-चेंजर” म्हणून पाहिले जात होते. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत उत्कृष्ट खेळ केला, ज्यामुळे विरोधक संघावर दबाव आला. सूर्यकुमारने अभिषेक शर्मासह त्यांची भागीदारी उत्कृष्ट असल्याचे सांगितले आणि दोघांनी मिळून पाहुण्या संघाला गेममधून बाहेर काढले.
या मालिकेत ईशान किशनच्या दमदार फॉर्ममुळे भारताने केवळ विजय मिळवला नाही, तर आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी संघाचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे.






