---Advertisement---

IND Vs ENG : आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव, जय शहाकडून मोठी घोषणा

Jay-Shah
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला आहे. तर या मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा झाला आहे. यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात भारतीय संघाला यश आलं आहे. याबरोबरच मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव म्हणजेच BCCI जय शहा यांनी भारतीय कसोटी संघासाठी मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय पुरुष कसोटी संघातील खेळाडूंसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू करताना मला आनंद होत आहे, जे आमच्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे. 2022-23 हंगामापासून सुरू होणारी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ ही कसोटी सामन्यांसाठी दिल्या जाणाऱ्या 15 लाखांच्या मॅच फी व्यतिरिक्त असणार आहे.

घ्या जाणून कशी असेल कसोटीतील इनसेंटिव्ह स्किम

हंगामातील 50 टक्के पेक्षा कमी ( 4 कसोटी सामन्यापेक्षा कमी) कसोटी सामने खेळले तर त्या प्लेईंग 11 आणि संघाबाहेरील खेळाडूंना एकही रूपया इनसेंटिव्ह मिळणार नाही.

हंगामातील 50 टक्के पेक्षा जास्त कसोटी सामने (5 ते 6) खेळले तर प्लेईंग 11 मधील खेळाडूला 30 लाख रूपये प्रती सामना तर इतर खेळाडूंना 15 लाख रूपये प्रती सामना इनसेंटिव्ह मिळणार आहे.

हंगामातील 75 टक्केपेक्षा जास्त कसोटी सामने ( 7 पेक्षा जास्त) खेळलेल्या प्लेईंग 11 मधील खेळाडूला 45 लाख रूपये प्रती सामना तर इतर खेळाडूंना 22.5 लाख रूपये प्रती सामना इनसेंटिव्ह मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तर भारताने या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला पण त्यानंतर उर्वरित चार कसोटी सामने जिंकले आहेत. याबरोबरच, या कसोटी मालिकेत एकही सामना पाचव्या दिवसापर्यंत झाला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---