भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धची पाच सामन्याची कसोटी मालिका 4-1 ने जिंकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत या ना त्या कारणाने दिग्गज खेळाडू खेळले नव्हते. त्यामुळे मालिकेत विजय मिळवणं कठीण होईल असा अनेक दिग्गजांचं म्हणणं होतं. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळलेल्या टीमने ही गणित खोडून काढली आहेत.
याबरोबरच कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर तसंच चित्र उभं राहिलं होतं. हैदाराबादमधील पहिली कसोटी भारताने 28 धावांनी गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. दुसरा कसोटी सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांनी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला आहे.
अशातच रोहितने या सामन्यात शतक झळकावून संघाला केवळ चांगली साथ दिली नाही, त्याशिवाय कर्णधार म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आजपर्यंत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. तर टीम इंडियाने हा विक्रम कायम ठेवला आहे. याशिवाय टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे विक्रम केले आहेत.
या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले आहेत.
दरम्यान, भारताने मालिका 4-1 ने जिंकल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणातालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं असून विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-