---Advertisement---

अँडरसनसाठी 700व्या कसोटी विकेटचा आनंद द्विगुणित! ‘या’ खास व्यक्तीने लावली होती मैदानात हजेरी

James Anderson
---Advertisement---

जेम्स अँडरसन याने शनिवारी (9 मार्च) कसोटी क्रिकेटमधील आपल्या 700 विकेट्स पूर्ण केल्या. धमरशालामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिला डाव संपल्यानंतर भारताकडे 259 धावांची आघाडी होती. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 218, तर भारताने 477 धावा केल्या आहेत. जेम्स अँडरसनसह त्याच्या वडिलांसाठी देखील शनिवारचा दिवस खास ठरला.

जेम्स अँडरसन (James Anderson) याने डिसेंबर 2002 मध्ये इंग्लंडसाठी वनडे क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पुढे मे 2003 मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना पाहण्यासाठी त्याचे वडील मैदानात उपस्थित होते. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. तिथपासून सुरू झालेला प्रवास शनिवारी 700 कसोटी विकेट्सपर्यंत पोहोचला. यात एक गोष्ट कायम आहेत, ती म्हणजे अँडरसनला वडिलांकडून मिळणारा पाठिंबा.

शनिवारी कुलदीप यादवला यष्टीरक्षक बेन फोक्स याच्या हातात झेलबाद केल्यानंतर अँडरसन 700 कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला. याआधी ही कामगिरी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांनी केली होती. अँडरसनसाठी या 700 विकेट्स आनंद द्विगुणित झाला असेल, कारण त्याच्या वडिलांनी मैदानात उपस्थित राहून ही 700वी विकेट पाहिली. अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील पहिली आणि 700वी विकेट त्यांनी लाईव्ह पाहिल्यामुळे याला एक विशेष महत्व प्राप्त होते.

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG । धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित संघातून बाहेर, जाणून घ्या कारण
“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---