आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होण्यास 13 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. IPL 2024ची पहिली लढत 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलमधील संघ नव्या हंगामाची तयारी सुरू असताना मुंबई इंडियन्साठी एक आनंदाची बातमी समोर आली असून श्रीलंकेचा स्टार गोलंदाजाने बांगलादेशविरुद्धच्या T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली आहे.
तसेच आगामी आयपीएल 2024 मध्ये प्रथमच श्रीलंकेचा स्टार गोलंदाज मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच नुवान तुषाराला प्रथमच आयपीएलमध्ये खरेदी करण्यात आले आहे. यामुळे नुवान तुषारा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर चांगली बोली लावली होती. तुषाराची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. पण फ्रँचायझीने लिलावात त्याला 4.80 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावून त्याला विकत घेतले आहे.
याबरोबरच नुवान तुषाराने ॲसिरियन मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला आहे. तर या सामन्यात बांगलादेशच्या डावाच्या चौथ्या षटकात नुवान तुषाराने दुसऱ्या चेंडूवर नझमुल हसन शांतोचा पहिला बळी घेतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तोहिद हृदयही त्याचा दुसरा बळी ठरला. तर तिसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाह त्याचा तिसरा बळी ठरला आणि अशा प्रकारे त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
W W W 💥
Nuwan Thushara bags a hat-trick against Bangladesh 👌#BANvSL | 📝: https://t.co/JnDZxpyt7J pic.twitter.com/0a0OKYekNU
— ICC (@ICC) March 9, 2024
यामुळे तो लसिथ मलिंगाच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. तसेच तुषारा श्रीलंकेसाठी आतापर्यंत हॅट्ट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याने लसिथ मलिंगा, वानिंदू हसरंगा, थिसारा परेरा आणि अकिला धनंजय यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
श्रीलंकेसाठी T20 मध्ये आतापर्यंत हॅट्ट्रिक घेणारे पाच गोलंदाज
थिसारा परेरा- विरुद्ध भारत, 2015-16
लसिथ मलिंगा- विरुद्ध बांगलादेश, 2016-17
लसिथ मलिंगा- वि न्यूझीलंड, 2019
अकिला धनंजय- वि. वेस्ट इंडिज, 2020-21
वानिंदू हसरंगा- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2021-22
महत्वाच्या बातम्या –