---Advertisement---

IND Vs ENG : धरमशाला कसोटीत कुलदीपपेक्षा जास्त विकेट्स घेऊनही अश्विन ‘प्लेअर ऑफ द मॅच’ का नाही?

---Advertisement---

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली आहे.

याबरोबरच, भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने इंग्लंविरूद्धच्या पाचव्या कसोटीत दमदार कामगिरी केली. आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनने सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 4 बळी टिपले होते. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तब्बल 26 विकेट्स घेतल्या आहेत.पण तरीही कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

रविचंद्रन अश्विनने या कसोटी सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना होता. पण या बाबतीत कुलदीप यादव त्याच्या पुढे होता की त्याने भारतीय फलंदाजीदरम्यान बॅटने विशेष योगदान दिले होते. कारण भारतीय डावाची धावसंख्या 428 धावा आणि 8 विकेट्स अशी होती. यानंतर कुलदीपने जसप्रीत बुमराहसह 9व्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या 477 पर्यंत नेली होती. यामुळे भारताला 259 धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. तसेच गोलंदाजीत कुलदीप यादवने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर BCCI ने ट्टिटरवर पोस्ट शेअर केली असून यावर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत म्हंटलं आहे की,  अश्विन आणि कुलदीप दोघांनाही हा पुरस्कार मिळाला नसावा का? हा पुरस्कार मिळवण्यासाठी अश्विन हाच योग्य माणूस आहे, असे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---