भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच थरारक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 177 धावांवर सर्वबाद झाला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 बाद 77 धावा केल्य. रविंद्र जडेजा आणि रविंचंद्रन अश्विन यांच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर रोहित शर्मा यानेही कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली.
https://twitter.com/BCCI/status/1623640713941630976?s=20&t=Xr_i5ObTruh2yMSpxDJgmw
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स () याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी कर्णधार कमिन्सचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे दोन सर्वात मोठे धक्के दिले. सलामीवीर डेविड वॉर्नर याची विकेट शमीने घेतली, तर उस्मान ख्वाजा सिराजच्या चेंडूवर पायचीत झाला. वॉर्नर आणि ख्वाजाने प्रत्येकी एक-एक धाव करून विकेट गमावल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथ यांनी. या दोघांनी ते अस्सल कसोटी फलंदाज असल्याचे दाखवून दिले. स्मिथने 107 चेंडूत 37 धावा केल्या, तर लाबुशेनने 123 चेंडूत 49 धावा केल्या होत्याय. हे दोघे खेळपट्टीव सेट झाले असताना संघाला त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या फिरकीच्या जाळ्यात दोघांनी विकेट गमावल्या. जडेजाने भारतासाठी पहिल्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करू शकला. जडेजाने टाकलेल्या 22 षटकांमध्ये 47 धावा खर्च केल्या आणि पाच विकेट्सचा हॉल नावावर केला. त्याव्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही तीन विकेट्स नावावर करत संघासाठी महत्वूप्ण योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनापुठे ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतकीय खेळी करू शकला नाही. परिणामी संघाने 177 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. केएल राहुलने 71 चेंडूत 20 धावा केल्या. तर रोहित शर्मा दिवसाचा खेळ संपेपर्यंत 69 चेंडूत 56 धावा करून खेळपट्टीवर नाबाद आहे. भारताने नाईट वाचमन म्हणून केएल राहुच्या विकेटनंतर रविचंद्रन अश्विन याला फलंदाजीसाठी पाटवले होते. अश्विन पाच चेंडूत 0 धावा केल्या असून तो खेळपट्टीवर कायम आहे. (The Indian team performed well on the first day of the first Test)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट घेताच नावावर झाला मोठा विक्रम, बनला दुसरा भारतीय
क्रिकेटपासून 6 महिने दूर राहिलेल्या जडेजाचा धमाका! कांगारूंच्या बत्त्या गुल करत साकारले विकेट्सचे पंचक