---Advertisement---

अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट घेताच नावावर झाला मोठा विक्रम, बनला दुसरा भारतीय

On: गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023 4:09 PM
R-Ashwin
---Advertisement---

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघासाठी पहिला कसोटी सामना खूपच निराशाजनक ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला या कसोटीच्या पहिल्या डावात खास कामगिरी करता आली नाही. त्यांचे फलंदाज झटपट बाद होत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना तंबूत धाडत भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने खास कारनामा करून दाखवला. अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय गोलंदाज ठरला.

आर अश्विनचा विक्रम
ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळी पाहुण्या संघाला खास कमाल दाखवता आली नाही. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांना यावेळी 63.5 षटकांचा सामना करताना सर्व विकेट्स गमावत फक्त 177 धावाच करता आल्या. आर अश्विन (R Ashwin) याने यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 54 वे षटक टाकताना पहिल्या चेंडूवर ऍलेक्स कॅरे (36) याला तंबूत धाडले. ऍलेक्स हा त्याची 450वी कसोटी विकेट ठरला. त्यानंतर 58 षटक टाकताना तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्स (6) याला तंबूत पाठवले. पुढे 64वे षटक टाकताना पाचव्या चेंडूवर स्कॉट बोलँड याला 1 धावेवर बाद केले.

या 3 विकेट्स घेताच अश्विनच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. त्याने भारताकडून खेळताना कसोटीत 452 विकेट्स पूर्ण केल्या. अशाप्रकारे तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसराच खेळाडू ठरला. त्याच्याव्यतिरिक्त भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा अनिल कुंबळे (Anil Kumble) याच्या नावावर आहे. त्याने भारताकडून कसोटीत सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
619 विकेट्स- अनिल कुंबळे
452 विकेट्स- आर अश्विन*

अश्विन एकमेव आशियाई खेळाडू
याव्यतिरिक्त अश्विनच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला. अश्विनने कसोटीत 3000 धावा आणि 450 विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव आशियाई खेळाडू ठरला.

भारतीय गोलंदाजी
भारताकडून अश्विनव्यतिरिक्त या डावात रवींद्र जडेजा याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 22 षटके गोलंदाजी करताना 47 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (Ravi Ashwin becomes the second Indian to take 450 Test wickets)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटपासून 6 महिने दूर राहिलेल्या जडेजाचा धमाका! कांगारूंच्या बत्त्या गुल करत साकारले विकेट्सचे पंचक
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---