Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्लेजिंग ऑन! पहिल्याच दिवशी अश्विनने लॅब्युशेनला डिवचले, करून दिली बुद्धिबळाची आठवण, पाहा व्हिडिओ

February 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आणला. रवींद्र जडेजा याने घातक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याचवेळी या मालिकेच्या सुरुवातीपासूनच सातत्याने चर्चेत असलेल्या भारताच्या रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेन याला डिवचण्याचे काम केले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर अवघ्या दोन धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असलेल्या मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरत संघाला पहिल्या सत्रात आणखी नुकसान होऊ न देता 75 धावा केल्या. त्याचवेळी यादरम्यान भारताचा अनुभव फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने लॅब्युशेन याला खिजवले.

pic.twitter.com/QEtzkrA44j

— Gajendra Singh Naruka (@imNaruka13) February 9, 2023

 

ऑस्ट्रेलियन डावाच्या 22 व्या षटकात अश्विन गोलंदाजी करत असताना एक चेंडू काहीसा वळण घेत आतमध्ये आला. या चेंडूवर लॅब्युशेन पूर्णपणे चकला. त्यावेळी अश्विन याने हाताच्या इशाऱ्याने त्याला चेंडू आतमध्ये आल्याचे सांगितले. तसेच अश्विनने हाताने बुद्धिबळ खेळत असल्यासारखी खूण केली.

सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच लॅब्युशेन याने अश्विनचे कौतुक करताना म्हटले होते की, त्याची गोलंदाजी खेळणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे आहे. त्याचेच उत्तर म्हणून अश्विनने ही कृती केली.

ऑस्ट्रेलियन डावाबाबत सांगायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन डावात माघारी परतल्यानंतर स्मिथ व लॅब्युशेन यांनी भागीदारी केली. मात्र, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच रवींद्र जडेजा याने आपल्या फिरकीचे जाळे विणत ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळवला. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर, भारतासाठी जडेजा आणि पाच व अश्विनने तीन बळी मिळवले.

(R Ashwin Trolled Marnus Labuschagne On His Chess Statement In Nagpur Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत


Next Post
Mohammad-Rizwan

पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, 'मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा'

KS-Bharat

चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल

Rohit Sharma

धमाकेदार फटकेबाजीने रोहितने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला केले खूश, म्हणाला, "तो विरोधी संघाला..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143