बुधवारी (2 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2025 चा 14 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान आरसीबीला हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. गुजरातविरुद्ध 8 विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये संघाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आरसीबीने केवळ पॉइंट्स टेबलमधील नंबर-1 चे स्थान गमावले नाही तर नेट रन रेटमध्येही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर, रजत पाटीदारचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचा नेट रन रेट आता +1.149 आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाचा फायदा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांना झाला आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत हंगामात फक्त 2-2 सामने जिंकले आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे ते आरसीबीपेक्षा पुढे गेले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा नेट रन रेट +1.320 आहे आणि संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रेयस अय्यरचा पंजाब संघ +1.485 च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
सध्या, गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाला आतापर्यंत तीनपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. आज (03 एप्रिल) त्यांचा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चौथा सामना आहे. दोन्ही संघ त्यांचे मागील सामने गमावले आहेत, त्यामुळे केकेआर आणि एसआरएच विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. एसआरएच टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.