आयपीएल स्पर्धा 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधी संघांमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मग ते कर्णधार असो की, इतर काही गोष्टी असो. अशातच आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी, दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने जेसन रॉयच्या जागी संघाची घोषणा केली आहे. तसेच जेसन रॉयने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतले होते.
याबरोबरच आयपीएल 2024 पूर्वी, कोलकाता नाइट रायडर्सने जेसन रॉयच्या जागी फिल सॉल्टचा संघात समावेश केला आहे. तसेच आयपीएल 2023 मध्ये फिल सॉल्ट दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्यानंतर त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत नव्हते घेतले. आयपीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाजाला केकेआरने त्याच्या राखीव किंमत 1.5 कोटी रुपयांत विकत घेतले आहे.
🚨 NEWS 🚨
KKR name Phil Salt as replacement for Jason Roy.
Details 🔽 #TATAIPL | @KKRiders https://t.co/KjezlTn4b8
— IndianPremierLeague (@IPL) March 10, 2024
तसेच आयपीएल 2024 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला केकेआरने संघाने तब्बल २४.७५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती. त्यामुळे तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. स्टार्कने २०१५ सालापासून ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवलेला नाही. असे असले तरी ‘आयपीएल’मधील संघ त्याला खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक दिसले होते.
यावर स्टार्क म्हणाला होता की, ‘‘क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून कुटुंबासाठी वेळ काढणे फार अवघड जाते. त्यात माझी पत्नीही (एलिसा हिली) क्रिकेटपटू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने नसताना मी एलिसा आणि कुटुंबासोबत जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. तसेच मी माझ्या शरीरावर लक्ष देतो, जेणे करून मला ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकेल.,’’
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असेल. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. गंभीरने लखनऊ संघाचे मार्गदर्शक पद सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-