---Advertisement---

स्म्रीती मंधाना ऑन फायर! विंडीजविरुद्ध झंझावाती फिफ्टी ठोकत रचला विक्रम, बनली जगातली तिसरी ओपनर

Smriti-Mandhana
---Advertisement---

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये सध्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात पार पडला. सोमवारी (दि. 23 जानेवारी) बफेलो पार्क, ईस्ट लंडन येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. हा सामना भारताने 56 धावांनी नावावर केला. यासोबतच भारताच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या स्म्रीती मंधाना हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, तिच्या नावावर खास विक्रमाची नोंदही झाली.

भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघातील या सामन्यातील नाणेफेक भारताच्या पारड्यात पडली. भारतीय महिला संघाने यावेळी फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 167 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज महिला संघाला 20 षटकात 4 विकेट्स गमावत 111 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 56 धावांनी जिंकला.

https://twitter.com/BCCIWomen/status/1617715310655832065

स्म्रीती मंधानाचा विक्रम
यावेळी भारताकडून सर्वाधिक सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने 51 चेंडूत नाबाद 74 धावांचे योगदान दिले. या धावा करताना तिने 1 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यासह स्म्रीतीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्म्रीतीने तिसरा क्रमांक पटकावला.

https://twitter.com/ICC/status/1617586704822505472

आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडची फलंदाज सूझी बेट्स हिच्या नावावर आहे. तिने सलामीला फलंदाजी करताना 3402 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आहे. तिने आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना 2570 धावा केल्या होत्या. तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या स्म्रीती मंधाना हिने सलामीला फलंदाजी करताना आतापर्यंत 2525 धावा केल्या आहेत.

स्म्रीती मंधानाची टी20 कारकीर्द
स्म्रीती मंधानाच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत भारताकडून 109 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तिने टी20त 105 डावात 27.85च्या सरासरीने 2646 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 20 अर्धशतकेही ठोकली आहेत. तसेच, 86 ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (ind women vs wi women cricketer smriti mandhana 3rd opening batter who scored most t20i runs read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---