---Advertisement---

भारतीय संस्कार दाखवत श्रीजेशने जिंकली लाखो मने, विजयानंतर केलेली कृती चर्चेत

PR Sreejesh
---Advertisement---

PR Sreejesh Viral Video : गुरुवारी (08 ऑगस्ट) भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनविरुद्ध 2-1 असा शानदार विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. यावेळी सर्वांच्या नजरा वळल्या त्या पीआर श्रीजेशकडे (PR Sreejesh Retirement Match). कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याला भारताने कांस्यपदकाची अविस्मरणीय भेट दिली. भारताने सामना जिंकल्यानंतर श्रीजेशने भारतीय संस्कार दाखवत सर्वांचीच मने जिंकली.

त्याचे झाले असे की, भारतीय हॉकी संघाच्या विजयानंतर श्रीजेशने चक्क गोलपोस्टला नमस्कार केला. श्रीजेशने यावेळी गोलपोस्टसमोर दंडवत घातले. सर्वांसाठीच हा एक भावूक क्षण होता. कारण श्रीजेशने ज्या एका कृतीने आपली भावना व्यक्त केली, त्यामधून सर्वांनाच भारताची संस्कृती नेमकं काय शिकवते, हे सर्वांना समजले.

दरम्यान भारताची हॉकीमधील भारताचा ‘दी वॉल’ असलेल्या श्रीजेशच्या निवृत्तीच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्याला खास अंदाजात निरोपही दिला. कांस्य पदक विजयानंतर अखेरचा सामना खेळलेला श्रीजेश उत्साही दिसत होता. त्याने गोलपोस्टवर चढाई केली. भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनीही हा विजय साधेपणाने साजरा करण्यास सांगितले. यानंतर भारतीय संघ श्रीजेशकडे धावला. त्यांनी श्रीजेशला मानवंदना दिली.

तसेच भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेशने मैदानातच लोटांगण घातले. त्याने झोपून त्याच्या हेल्मेटला आणि गोलपोस्टला सलाम केला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. यानंतर श्रीजेशने सर्वांना मिठी मारली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत याने स्वतः श्रीजेशला खांद्यावर उचलत मैदानात फेरी मारली.

श्रीजेश याने सामन्यानंतर आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे, कुटुंबाचे व संघटनांचे आभार मानले. तसेच, भविष्यात भारतीय हॉकी सोबत जोडून राहण्यास आवडेल असे देखील तो म्हणाला.

हेही वाचा – 

पीआर श्रीजेशला खेळाडूंचा कुर्निसात! ऐतिहासिक पदकानंतर मिळाला खास निरोप
भारताच्या पठ्ठ्यांनी करून दाखवलं! सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्यपदक
टीम इंडियावर भारी पडलेल्या श्रीलंकेच्या ‘या’ 3 खेळाडूंवर आयपीएल 2025च्या मेगा लिलावात लागू शकते मोठी बोली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---