---Advertisement---

मोहम्मद शमीचा दयाळूपणाने जिंकली चाहत्यांची मने! मैदानात घुसलेल्या चाहत्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शुक्रवार, फेब्रुवारी 17, 2023 7:22 PM
Mohammad Shami
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात देखील संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच रोमांचक राहिला. मोहम्मद सिराजने देखील सामन्याच्या पहिल्या दिवशी अप्रतिम प्रदर्शन केले. सोबतच शमीने मैदानात दाखवलेल्या मोठ्या मनासाठीही त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) साठी खास ठरला. शमीने सामन्याच्या पहिल्या दिवसी भारतासाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. यासाठी त्याने 14.4 षटकात 60 धावा खर्च देखील केल्या. त्याव्यतिरिक्त रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रिवंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा गाशा स्वस्तात गुंडाळला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 263 धावा करू शकला.

भारतीय संघाने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी करावी लागली. भारताच्या गोलंदाजीवेळी अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता थेट मैदानात घुसला. या चाहत्याला खेळाडूंसोबत जाऊन फोटो काढण्याची इच्छा होती. पण त्याआधीच ग्राउंड स्टाफने त्याला पकडले आणि जबरदस्तीने मैदानाबाहेर नेऊ लागले. या चाहत्याला ग्राउंड स्टाफचे कर्मचारी ज्या पद्धीतीने मैदानाबाहेर घेऊन जात होते, ते मोहम्मद शमीला आवडले नाही. अशात शमी या कर्मचाऱ्यांना सांगताना दिसला की, “या चाहत्याला दमाने मैदानाबाहेर न्या.” शमीचे हे वर्तन चाहत्यांना मात्र चांगलेच भावले. शमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दुसऱ्या कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्यानंतंर उस्मान ख्वाजाला साथ देण्यासाठी मैदानात आलेल्या स्टीव स्मिथ याला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ख्वाजाने 81 तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पीटर हॅन्ड्सकॉम्ब याने 72 धावांची खेळी केली. (The fan who entered the ground was being evicted by the ground staff, but Mohammad Shami’s behavior won the hearts of the fans.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
दिल्ली कसोटी: पहिला दिवस टीम इंडियाचा नावे, ऑस्ट्रेलियाला गुंडाळल्यानंतर दिवसाअखेर भारत बिनबाद 21

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---