Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली कसोटी: पहिला दिवस टीम इंडियाचा नावे, ऑस्ट्रेलियाला गुंडाळल्यानंतर दिवसाअखेर भारत बिनबाद 21

February 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपवला. त्यानंतर भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ‌‌‌‌‌‌बिनबाद 21 धावा केल्या.

Stumps on Day 1⃣ of the second #INDvAUS Test!#TeamIndia openers see through the final overs of the day's play and finish with 21/0 👌

We will be back with action tomorrow on Day 2, with India trailing by 242 more runs.

Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 @mastercardindia pic.twitter.com/isQQ7ayrEv

— BCCI (@BCCI) February 17, 2023

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी या दौऱ्यावर प्रथमच संघाला 50 धावांची सलामी दिली.‌ त्यानंतर ख्वाजा व‌‌ लॅब्युशेन यांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, रविचंद्रन अश्विन याने लॅब्युशेन व अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांना केवळ तीन चेंडूंच्या अंतराने तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाचे तीन सर्वात अनुभवी फलंदाज तंबूत पाठवले. एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना ख्वाजा याने अर्धशतक साजरे केले.

त्याने पीटर हॅंड्सकॉम्बसह पाचव्या गड्यासाठी 59 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. तो शतकाकडे मार्गक्रमण करत असताना केएल राहुल याच्या अप्रतिम झेलाने तो 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅंड्सकॉम्ब व कर्णधार पॅट कमिन्स या 60 धावांची भागीदारी केली. मात्र, जडेजा याने एकाच षटकात कमिन्स व मर्फी यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव अखेरीकडे नेला. अखेरीस मोहम्मद शमी याने अखेरचे दोन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 263 वर संपवला. पीटर हॅंड्सकॉम्ब 72 धावांवर नाबाद राहिला. भारतासाठी शमीने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर, अश्विन व जडेजा या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.

दिवसातील उर्वरित 9 षटकात रोहित शर्मा व केएल राहुल यांनी भारतासाठी सांभाळून फलंदाजी केली. दिवसातील अखेरच्या षटकात पंचांनी लायनच्या गोलंदाजीवर रोहितला बाद देखील ठरवले होते. मात्र, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर रोहित नाबाद ठरवला गेला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 13 व राहुल 4 धावा काढून खेळत होता.

(Team India Dominate Day 1 In Delhi Test Against Australia)


Next Post
Sunrisers-Hyderabad

हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने 'या' खेळाडूचं घेतलं नाव

MS-Dhoni

आयपीएल 2023मधील सीएसकेचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, 'थाला' चेन्नईला पाचव्यांदा बनवणार का चॅम्पियन?

Mumbai Indians Team

आयपीएल 2023: असे आहे मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक, यंदा सहाव्या विजेतेपदाचे आव्हान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143