IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ‘या’ दिवशी होणार GT आणि MIचा सामना, पाहा आकडेवारी

IPL 2024 :  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. तसेच आयपीएलच्या 17व्या हंगामातील पहिला सामनाही चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर हा सामना यलो आर्मीचे होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 24 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. 

याबरोबरच, हार्दिक पांड्या गेल्या वर्षीपर्यंत गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली गुजरातने अंतिम फेरी गाठली होती, पण मुंबई इंडियन्स गुजरातविरुद्ध काय चमत्कार दाखवू शकते हे पहावे लागणार आहे. तर आज आपण मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आत्तापर्यतची आकडेवारी काय सांगते हे जाणून घेणार आहोत.

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश करत पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. तर 2022 आणि 2023 मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत होता. 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात यांच्यात फक्त एकच सामना खेळला गेला होता. तर त्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा फक्त 5 धावांनी पराभव केला होता.

यानंतर 2022 मध्ये गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद देखील पटकावले होते. तर 2023 मध्ये मुंबई आणि गुजरात तीनदा आमनेसामने आले होते. ज्यामध्ये 2 सामने गुजरातच्या बाजूने गेले. तर एक सामना मुंबई इंडियन्सने जिंकला होता. IPL 2023 च्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईचा 62 धावांनी पराभव केला. ज्यामध्ये आतापर्यंत दोन्हीं संघामध्ये 4 सामने झाले असून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आहे.

https://twitter.com/gujarat_titans/status/1765701521931645428

दरम्यान, आयपीएलच्या 17 व्या हंगामात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स रविवारी, 24 मार्च रोजी प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत. तर हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तसेच या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरवात होणार आहे. तर आयपीएलच्या 17 व्या हंगामात हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. तर शुभमन गिलही पहिल्यांदा गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles