---Advertisement---

युवा कबड्डी सिरीज मध्ये लातूर संघाची धाराशिव संघावर मात

On: मंगळवार, मार्च 12, 2024 11:31 PM
---Advertisement---

पुणे (12 मार्च 2024) – ‘ब’ गटातील लढती मध्ये आज पहिल्या दिवशी शेवटचा सामना धाराशिव विरुद्ध लातुर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. दोन्ही संघाच्या बचावपटूंनी विरुद्ध संघाच्या चढाईपटूंना बाद करत आपल्या संघाचे खाते उघडले. 5 मिनिटांच्या खेळानंतर 2-2 असा सामना संथ सुरू होता. धाराशिव संघाकडून निलेश व्हारे ने चढाईत उत्कृष्ट खेळ दाखवत संघाला गुण मिळवून दिले.

मध्यंतरा पर्यत चांगला चुरशी खेळ बघायला मिळाला. लातूर संघाने 15-12 अशी आघाडी घेतली होती. लातूर संघाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत धाराशिव संघाला ऑल आऊट केले. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना लातूर संघाकडे 26-19 अशी आघाडी होती. प्रदिप आकांगिरेच्या उत्कृष्ट खेळीने लातूर संघाने सामन्यावर पकड मजबूत केली.

धाराशिव संघाने उत्तरार्धात चांगला प्रतिकार केला मात्र त्याना पराभावाला सामोरे जावे लागले. लातूर संघाने 35-31 असा विजय मिळवला. लातूर कडून प्रदिप आकांगिरेने चढाईत सर्वाधिक 16 गुण मिळवले. तर रोहित पवार ने 5 पकडी केल्या. धाराशिव संघाकडून निलेश व्हारे ने सर्वाधिक 19 गुण मिळवले. जगदीश काळे ने अष्टपैलू खेळ करत 10 गुण मिळवले. (Latur team beat Dharashiv team in Yuva Kabaddi series)

बेस्ट रेडर- निलेश व्हारे, धाराशिव
बेस्ट डिफेंडर- रोहित पवार, लातूर
कबड्डी का कमाल- जगदीश काळे, धाराशिव

महत्वाच्या बातम्या – 
पॅट कमिन्सने घेतलं ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं श्रेय! म्हणाला, ‘मला माहीत नव्हतं ऍलेक्स कॅरी…’
टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा मोठा प्लॅन! विराटविषयी बातमी वाचून नाही बसणार विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---