क्राइस्टचर्च कसोटी सामन्याच्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने विनिंग शॉट मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सच्या या शॉटमुळे ऑस्ट्रेलियाला चौथ्या दिवसाच्या (सोमवार, 11 मार्च) दुसऱ्या सत्रात यजमान न्यूझीलंडला मात दिली. पण त्याने हा शॉट का मारला, असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. कारण नॉन स्ट्राईक एंडवर ऍलेक्स कॅरी त्यावेळी 98 धावांसर नाबाद होता.
न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियान 0-2 अशा अंतराने नावावर केली. ऍलेक्स कॅरी (Alex Carey) याचे विजयातील योगदान महत्वाचे राहिले. पण अवघ्या 2 धावा कमी पडल्याने त्याचे शतक हुकले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे शतक असू शकत होते. पण पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या विनिंग शॉटमुळे हे शतक होऊ शकले नाही. न्यूझीलंडने या सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 279 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 80 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कॅरीने सातव्या विकेटसाठी मिचेल मार्शसोबत 7व्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. तसेच 8व्या विकेटसाठी पॅट कमिन्स यांला 61 धावांची नाबाद भागीदारी केली. दुसरीकडे पॅट कमिन्स याने 32* धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
कमिन्सने जर सामन्याच्या शेवटी ऍलेक्स कॅरी याला स्ट्राईक दिली असती, तर त्याचे शतक पूर्ण झाले असते. मात्र कर्णधाराला याची जराही कल्पना नव्हती की कॅरी 98* धावांवर खेळत आहे. सामना संपल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला, “हे खूप तनावपूर्ण होते. मागच्या काही तासांमध्ये प्रत्येकजण घाबरलेला होता. हा एक अद्भुत विजय होता. असाही (विनिंग शॉटवर) विजय शक्य आहे. मला माहीतच नव्हते की, कॅरी 98 धावांवर आहे.”
कमिन्सने क्राइस्टचर्च कसोटीत नाणेफेक महत्वाची ठरली, असे कमिन्स म्हणाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 162 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 256 धावांपर्यंत मजल मारली आणि 94 धावांची आघाडी मिळवली. (Pat Cummins took credit for Australia’s victory! Said, ‘I didn’t know Alex Carey…’)
महत्वाच्या बातम्या –
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा! रणजी फायनलसाठी सचिन-रोहितची वानखेडेत हजेरी, सोशल मीडियावर चर्चा
केन विलियम्सनवर भारी पडला युवा यशस्वी जयस्वाल! आयसीसीकडून घेतली गेली दखल