आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ खूप मजबूत दिसत आहे. मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं अनेक खेळाडूंवर बोली लावली. यंदाच्या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार नाही. संघानं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला आपला नवा कर्णधार घोषित केलं आहे.
मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, टीमचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव पहिल्या दोन मॅचमधून बाहेर पडू शकतो. मुंबई इंडियन्सला 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. या दोन सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवला एनसीएच्या वैद्यकीय पथकाकडून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावं लागेल. एनसीए सूर्यकुमारला फिटनेस सर्टिफिकेट देतं की नाही यावरही सस्पेंस आहे. या मोसमात सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळले नाहीत तर त्यामुळे संघाचं मोठं नुकसान होऊ शकतं.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही सहभागी होऊ शकला नाही. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. सूर्यकुमार यादव नुकताच अर्शदीप सिंगसोबत व्यायाम करताना दिसला होता. खुद्द सूर्यकुमारनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यानं आयपीएलमध्ये 139 सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3249 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 31.85 आणि स्ट्राईक रेट 143.32 राहिला. 103 ही त्याची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या नावे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 शतकं आहेत. तो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.
इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा सीजन 22 मार्च 2024 पासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात खेळला जाईल. या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, कारण दोन्ही संघांना हंगामाची सुरुवात विजयानं करायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्स नाही, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करेल ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ