ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आहे. तर न्यूझीलंडला आपल्या घरात ऑस्ट्रेलियाकडून टी 20 पाठोपाठ टेस्ट सीरिज गमवावी लागली. न्यूझीलंडला यामुळे मोठा फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलियाने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी पॉइंट्स टेबलमध्ये 1 स्थानाची झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी पोहचलीय. तर न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही वेळा टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र टीम इंडिया दोन्ही वेळा अपयशी ठरली. टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम फेरीत धुव्वा उडवला होता.
अशातच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिन्ही संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.त्यामुळे या तिघांपैकी कोणतेही दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा महामुकाबला हा इंग्लंडमधील लॉर्ड्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्सटेबलनुसार, एका संघाला विजयासाठी 12 पॉइंट्स, सामना टाय झाल्यास 6 आणि ड्रॉ झाल्यास 4 पॉइंट्स मिळतात. तसेच स्लो ओव्हर रेटमुळे 2 पॉइंट्स दंड स्वरुपात कापले जातात. याच कारणामुळे इंग्लंडच्या खात्यात 3 विजयानंतरही 21 पॉइंट्स आहेत.
सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र न्यूझीलंडचे बरेच सामन् बाकी आहेत. न्यूझीलंड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ही भारताची या साखळीतील मायदेशातील अखेरची कसोटी मालिका असणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियालाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अखेरची मालिका घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध खेळणार आहे. तसेच भारतीय संघ 2024 वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून दोन्हीं संघात 5 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी दोन्ही संघ निश्चित ठरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-