---Advertisement---

केन विलियम्सनवर भारी पडला युवा यशस्वी जयस्वाल! आयसीसीकडून घेतली गेली दखल

Yashasvi Jaiswal
---Advertisement---

यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची होती. यजमान भारतीय संघाने मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सलामीवीर पलंदाजाने 89च्या सरासरीने 712 धावा केल्या. मंगळवारी (12 मार्च) आयसीसीकडून जयस्वालला या मालिकेतील अप्रतिम प्रदर्शनासाठी बक्षीस मिळाले.

यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला फेब्रुवारी महिन्यातील प्रदर्शनासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिला गेला. मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्याने कसोटी पदार्पण केले. खूप कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाला वजन मिळवून दिले आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने सलग दोन सामन्यांमध्ये द्विशतके केली आहेत. यासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देखील दिला गेला.

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला, “मी हा आयसीसी पुरस्कार जिंकून खूप खुश आहे. येत्या काळात असेच पुरस्कार जिंकत राहील, अशी अपेक्षा आहे. ही माझी पहिलीच पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबतचा हा एक अविश्वसनीय अनुभव होता. मी सराव सत्रांमधील माझा सराव कायम ठेवतो. माझ्यापेक्षा वरिष्ठ खेळाडूंकडून शिकत असतो. मैदानात आपले सर्वोत्तम प्रदर्शन देण्याच प्रयत्न करतो.”

फेब्रुवारी महिन्यात प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निसांका हेदेखील स्पर्धेत होते. पण यशस्वी जयस्वालचे प्रदर्शन विलियम्सन आणि निसांका यांच्यावर भारी पडले. यशस्वी जयस्वालने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकण्याआधी अनेक महत्वाचे विक्रम नावावर केले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातील खूप कमी खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. (Yashasvi Jaiswal won the ICC Player of the Month award)

महत्वाच्या बातम्या – 
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?
लिजेंड्स लीगच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर, जागतिक क्रिकेटमधील बडे स्टार्स उतरतील मैदानात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---