---Advertisement---

युवा खेळाडूंसाठी प्रेरणा! रणजी फायनलसाठी सचिन-रोहितची वानखेडेत हजेरी, सोशल मीडियावर चर्चा

---Advertisement---

मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. मंगळवारी (12 मार्च) म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई संघ 528 धावांनी आघाडीवर आहे. उभय संघांतील हा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानात दिग्गजांनी हजेरी लावली. युवा खेळाडूंना नक्कीच यातून देशांतर्गत क्रिकेटचे महत्व समजू शकते.

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका रोहित शर्मा () याच्या नेतृत्वात नावावर केली. यजमान संघाने या मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताने पराभव स्वीकारला. पण शेवटच्या चारही सामन्यांमध्ये रोहितच्या मार्गदर्शनत भारतीय संघ जिंकला. पाहुण्या संघाच्या बॅझबॉल रणनीतीला भारतीय खेळाडूंना चोख प्रत्युत्तर या मालिकेत दिले.

इंग्लंडविरुद्ध ही कसोटी मालिका सुरू असताना रोहित मागच्या आठवड्यात म्हणाला होता की, देशांतर्गत क्रिकेट खूप महत्वाचे आहे, कारण हाच खेळाचा खरा गाभा आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चाहते असे म्हणत आहेत की, रोहित जे बोलला, तेच करत आहे.

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळला आहे. मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रणजीचा अंतिम सामना पाहण्यासाठी सचिनने देखील वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. सचिनचे मैदानातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर मुशीर खान याने मुंबईसाठी दुसऱ्या डावात 136 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या शतकामुळे मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावा केल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात मुंबई संघ 224 धावांवर सर्वबाद झाला होता. दुसरीकडे विदर्भ संघ पहिल्या डावात अवघ्या 105 धावांवर सर्वबाद झाला. मंगळवारी दिवसाखेर विदर्भने नाबद 10 धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना शेवटच्या डावात अजून 528 धावांची आवश्यकता असून मुंबईसाठी विजय सोपा दिसत आहे. (Inspiration for young players! Sachin-Rohit’s presence at Wankhede for Ranji final, discussion on social media)

महत्वाच्या बातम्या – 
केन विलियम्सनवर भारी पडला युवा यशस्वी जयस्वाल! आयसीसीकडून घेतली गेली दखल
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये कोल्हापूर संघाची विजयी सलामी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---