---Advertisement---

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये कोल्हापूर संघाची विजयी सलामी.

File Photo
---Advertisement---

पुणे (12 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजपासून ‘ब’ गटातील सामान्यांना सुरुवात झाली. मागील वर्षीचा उपविजेता नाशिक संघ विरुद्ध कोल्हापूर यांच्यात पहिला सामना झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईत आपल्या संघाचे खाते उघडले. कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने चतुरस्त्र चढाया करत चांगले गुण मिळवले. नाशिकच्या शिवकुमार बोरगोडे ने चढाईत गुण मिळवत सामन्यात रंगत आणली होती.

कोल्हापूर संघाने 11 व्या मिनिटाला नाशिक संघाला ऑल आऊट करत 12-06 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर नाशिक संघाच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत 06-15 पिछाडी वरून मध्यंतरापर्यत 16-18 अशी पिछाडी कमी केली. मध्यंतरापूर्वी नाशिक संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट केले होते. मध्यंतरा नंतर दोन्ही संघाच्या मध्ये चांगली चुरस बघायला मिळाली. सौरभ फगारे व ओंकार पाटीलच्या सुपर टेन खेळीच्या जोरावर कोल्हापूर ने नाशिक संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यात निर्यायक आघाडी मिळवली.

उत्तरार्धात सामना चांगला रंगदार झाला होता. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना 35-27 अशी आघाडी कोल्हापूर संघाकडे होती. नाशिकच्या सौरभ फगारे ने सुपर रेड करत आपल्या पिछाडी कमी करत संघाचा पराभव 7 गुणांच्या कमी फरकाने करण्यात यश आले. अखेर सामना कोल्हापूर संघाने 37-33 असा जिंकला. सौरभ फगारे व ओमकार पाटील चढाईत उत्कृष्ट खेळ केला तर दादासो पुजारी ने 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. (K. M. P. Kolhapur team’s winning debut in Yuva Kabaddi Series 2024)

बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल- शशिकांत बारकंड, नाशिक

महत्वाच्या बातम्या – 
ऋषभ पंत IPL 2024 खेळण्यासाठी फीट; मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेतून बाहेर
पॅट कमिन्स नाही, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करेल ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---