पुणे (12 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजपासून ‘ब’ गटातील लढतीना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूर, नंदुरबार, पालघर व लातूर या संघांनी विजय मिळवला. आजचे सामने संमिश्र झाले. ‘ब’ गटातील टॉप 4 संघ प्रमोशन फेरीत प्रवेश करतील.
आजच्या पहिल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 37-33 असा नाशिक संघावर विजय मिळवला. कोल्हापूर संघाकडून सौरभ फगारे व ओमकार पाटील यांनी सुपर टेन पूर्ण करत स्पर्धेत जोरदार सुरुवात केली. तर दादासो पुजारीने हाय फाय पूर्ण करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नंदुरबार विरुद्ध सांगली यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. जवळपास 29 मिनिटं पर्यत कोणताही संघ 2 पेक्षा जास्त गुणांची आघाडी घेऊ शकला नाही. त्यानंतर सांगली ने आधी नंदुरबार संघाला ऑल आऊट केले तर शेवटच्या मिनिटाला नंदुरबार संघाने सांगली ला ऑल आऊट करत 36-31 असा सामना जिंकला.
आजच्या तिसऱ्या सामन्यात पालघर जिल्हाने सातारा जिल्ह्याचा एकतर्फी पराभव केला. 44-24 असा विजय मिळवत पालघर संघाने विजयाचा खात उघडलं. यश निंबाळकर व प्रतिक जाधवच्या खेळीने विजय सोपा झाला. तर योगेश मोरसे ने बचवाफळी मध्ये उत्कृष्ट खेळाचा नमुना दाखवला. तर आजच्या शेवटच्या सामन्यात लातूर संघाने 35-31 असा धाराशिव संघावर विजय मिळवला. लातुर संघाकडून प्रदिप आकांगिरे व रोहित पवार ने उत्कृष्ट खेळ केला तर धाराशिव कडून निलेश व्हारे व जगदीश काळे ने चांगला खेळ दाखवला.
संक्षिप्त निकाल-
नाशिक जिल्हा 33 – कोल्हापूर जिल्हा 37
नंदुरबार जिल्हा 36 – सांगली जिल्हा 31
सातारा जिल्हा 24 – पालघर जिल्हा 44
धाराशिव जिल्हा 31 – लातूर जिल्हा 35
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 । स्मृतीची आरसीबी प्लेऑफसाठी पात्र, अष्टपैलू प्रदर्शनामुळे एलिस पेरी ठरली मॅच विनर
टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा मोठा प्लॅन! विराटविषयी बातमी वाचून नाही बसणार विश्वास