IPLक्रिकेटटॉप बातम्या

हिटमॅन रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, पाहा व्हिडिओ

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका नुकतीच संपली असून सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. पण कर्णधार रोहित शर्माच्या मनात काही वेगळंच सुरु असल्याचं दिसून आलं. एकीकडे मुंबई इंडियन्सचे खेळाडू नारळ फोडून कामाला लागलेत. पण रोहित शर्मा दुसऱ्याच ड्रेसिंग रुममध्ये बसलेला पहायला मिळाला आहे. यामुळे सगळेच चकीत झाले आहेत.

याबरोबरच आयपीएलच्या 17व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरवात होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स शुभारंभाचा नारळ फोडला असून सराव सुरु केला आहे. यावेळी मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बराच बदल पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या नेतृत्व सांभाळताना दिसणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी राहील याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा जेतेपद मिळवून देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशी सर्व तयारी सुरु असताना रोहित शर्मा अजून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झालेला नाही. या दरम्यान रोहित शर्मा वेगळ्याच ड्रेसिंग रुममध्ये दिसला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासोबत कधी येईल याबाबतही कोणालाच पत्ता नाही. या दरम्यान रोहित शर्मा रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत दिसला आहे.

रणजी स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात सुरू आहे. तर हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माने हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी सोबत बसलेला दिला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. मुंबईच्या ड्रेसिंग रुममधला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच आता स्वत:च मुंबई संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये गेल्याने चाहते खूश झाले आहेत.

दरम्यान, रोहित शर्माने 2013 ते 2023 या कालावधीत मुंबई इंडियन्स नेतृत्व केलं. या दहा वर्षाच्या कालावधीत त्याने मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल चषकावर नाव कोरलं. रोहित शर्माने आयपीएलमध्ये एकूण 243 सामने खेळले असून 29.58 च्या सरासरीनने 6211 धावा केल्या आहेत. यात 42 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles