आयपीएलच्या17 व्या हंगामासाठी सर्व फ्रँचायझींचे खेळाडू आयपीएल 2024 साठी आपापल्या संघात सामील होत आहेत. तसेच आयपीएलच्या17 व्या हंगामाला 22 मार्चपासून गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यांतील सामन्याने सुरवात होणार आहे. त्याआधी हार्दिक पांड्या या वेळी मुंबई इंडियन्सची जबाबदारी सांभाळणार आहे. यासाठी तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याचा चांगला समाचार घेतला आहे.
याबरोबरच, हार्दिक पांड्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला होता. दुखापतीमुळे हार्दिकची एखाद्या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यानंतर, आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि इतकेच नाही तर मुंबईने त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवले. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडला नव्हता. यानंतर आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारने हार्दिक पांड्याचा समाचार घेतला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रवीण कुमारने हार्दिक पांड्याबद्दल म्हणाला आहे की, तू देशासाठी खेळत नाहीस, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तू तुझ्या राज्यासाठी खेळत नाहीस आणि आयपीएलच्या आधी तू फिट होतो. अशा शब्दात प्रवीण कुमारने हार्दिक पांड्या चांगलेच फटकारले आहे.
https://twitter.com/bijjuu11/status/1767443906789052424
अशातच मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये मार्क बाउचरसोबत दिसत आहे. मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये हार्दिक पांड्याचे जंगी स्वागत करण्यात आले. हार्दिक पांड्याने सर्वप्रथम देवाचे आशीर्वाद घेतले. आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी नारळ फोडण्याचे काम केले आहे.
चला सुरु करूया 🙏🥥#OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 pic.twitter.com/XBs5eJFdfS
— Mumbai Indians (@mipaltan) March 11, 2024
दरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आयपीएल 2015 चा भाग बनला. पण आयपीएल मेगा लिलाव 2022 पूर्वी तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला. तो आता 2 वर्षानंतर संघात परतला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- WPL 2023 : आरसीबीने टॉप 3 मध्ये एन्ट्री करताच मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ
- अखेर ठरलं! IPL 2024साठी विराट कोहली ‘या’ दिवशी होणार आरसीबीच्या ताक्यात दाखल