---Advertisement---

स्टोक्सनंतर आता न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूने मानसिक आरोग्याच्या कारणाने घेतली इंग्लंड दौऱ्यातून माघार

---Advertisement---

गेल्या २ वर्षात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळात सकारात्मक बदल घडत असल्याचे दिसत आहे. अनेक खेळाडू मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलत आहेत, तसेच अनेक खेळाडूंनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचाही निर्णय घेतला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या कारणाने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.

आता त्याच्यानंतर न्यूझीलंडची अष्टपैलू महिला खेळाडू एमेलिया केरने तिच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे.

न्यूझीलंड संघाला सप्टेंबरमध्ये 3 आंतरराष्ट्रीय टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंड दौरा करायचा आहे. पण या दौऱ्यातून माघार घेण्याचा एमेलिया केरने निर्णय घेतला आहे.

तिने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘मला न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करायला आणि राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळायला आवडते. तरी मी माझ्याबरोबरच्या खेळाडूंशी चर्चा करून माझे मानसिक आरोग्य सुधारण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. मला असं वाटतं की सध्याच्या स्थितीत हा निर्णय माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.’

एमेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 एकदिवसीय आणि 41 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने 686 धावा केल्या असून 60 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी-20 मध्ये तिने 217 धावा केल्या असून 39 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर 16 सदस्यीय न्यूझीलंड महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी सोफी डिवाइनने म्हटले की, संघाला एमेलियाची कमतरता जाणवेल.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे खेळाडूंना अनेक दिवस क्वारंटाईन राहावे लागत आहे. तसेच सामन्यांदरम्यान बायोबबलमध्ये राहावे लागत आहे. त्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही होताना दिसत आहे. याबद्दल अनेकदा खेळाडूंनी उघडपणे आपली मतं मांडली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पावसामुळे अखेरचा टी२० सामना रद्द झाला, पण वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानी खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने जिंकली मनं

भारीच!! चक्क लॉर्ड्सच्या बाल्कनीत ‘या’ महिला क्रिकटरने केले पदवीधर झाल्याचे सेलिब्रेशन; ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील घटना

‘द हंड्रेंड’मध्ये पुन्हा एकदा जेमिमा रॉड्रिग्जची वादळी खेळी, स्पर्धेत तिसऱ्यांदा झळकावले अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---