पाकिस्तानला गुरुवारी (6 जून) आयसीसी टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपसेट सहन करावा लागला. यजमान अमेरिकेनं गतवेळच्या उपविजेतेत्यांचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. आता या सामन्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ अडचणीत सापडला आहे.
वास्तविक, हरिस रौफवर बॉल टेम्परिंगचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्येष्ठ अमेरिकन क्रिकेटर रस्टी थेरॉन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रौफवर हे आरोप केले. दोन षटकांपूर्वी बदललेला चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होऊ लागला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण तापलं तर हरिस रौफ अडचणीत येऊ शकतो आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल आयसीसी देखील घेऊ शकते.
सामन्यानंतर रस्टी थेरॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं, “काय आपण असंच भासवणार आहोत का की पाकिस्ताननं नव्यानं बदललेल्या चेंडूशी छेडछाड केली नाही? दोन षटकांपूर्वी बदललेला चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होऊ लागला? हरिस रौफ सतत बॉलवर आपल्या अंगठ्याची नखं कशी घासत होता हे तुम्ही पाहू शकता.”
@ICC are we just going to pretend Pakistan aren’t scratching the hell out of this freshly changed ball? Reversing the ball that’s just been changed 2 overs ago? You can literally see Harris Rauf running his thumb nail over the ball at the top of his mark. @usacricket #PakvsUSA
— Rusty Theron (@RustyTheron) June 6, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामना 6 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अमेरिकेनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पाकिस्तान संघाला 20 षटकांत 7 विकेट गमावून 159 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनंही 20 षटकांत 3 गडी गमावून 159 धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरनं 18 धावा दिल्या. प्रत्युत्तरात, संघाला केवळ 13 धावाच करता आल्या.
एकेवेळी अमेरिका हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र चेंडू बदलल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी लगेच काही चांगली षटकं टाकली, ज्यानंंतर त्यांनी सामन्यात पुनरागमन केलं. शेवटच्या षटकात अमेरिकेला विजयासाठी 15 धावांची गरज होती. नितीश कुमारनं शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्ताननं अमेरिकेला हलक्यात घेतलं का? बाबर आझमनं सांगितलं धक्कादायक पराभवामागचं कारण
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव