भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा तिचा आज म्हणजे मंगळवारी (15 ऑक्टोबर) 36वा वाढदिवस साजरा करत आहे. यामुळे तिच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये एक विशेष शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच त्या दोघांचा घटस्फोट होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अशा स्थितीत शोएबने सानियाला सोशळ मीडियावर विश केल्याने ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शोएब मलिक (Shoaib Malik) याने इंस्टाग्रामवर सानिया मिर्झा (Sania Mirza) सोबतचा फोटो पोस्ट केला. त्याला साधे, सोपे कॅप्शन देत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्याने लिहिले, ‘तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सानिया. तुम्हाला चांगले आणि निरोगी स्वास्थ लाभो. या दिवसाचा भरपूर आनंद घ्या.’
मागील काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचा काठीमोड होणार अशा चर्चा सुरू होत्या. याबाबतीत या दोघांकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. या दोघांनी 2010मध्ये लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगाही आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली त्यावरून हे दोघे एका टॉक-शोमध्ये सहभाग घेताना दिसले. त्या शोचे पोस्टर चॅनलने रिलीज केले असून दोघांमध्ये आता सर्व सुरळीत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवरून मात्र चाहत्यांनी वेगळाच अर्थ काढला. त्यांनी म्हटले मग काय हा रिऍलिटी स्टंट होता का.
सानियाने तिच्या कारकिर्दीत महिला दुहेरीत विम्बल्डन ओपन (2015), यूएस ओपन (2015), ऑस्ट्रेलिया ओपन (2016) आणि मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलिया ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012), यूएस ओपन (2014) हे ग्रॅंड स्लॅम जिंकले. तसेच तिने 13 एप्रिल 2015मध्ये जागतिक क्रमावारीत दुहेरीमध्ये पहिले स्थान गाठले होते. 2015मध्ये तिला भारताचा सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारही मिळाला होता. 2006मध्ये पद्मश्री, 2016मध्ये पद्म भूषण याचीही ती मानकरी ठरली. Amid Divorce News, Shoaib Malik Wishes Sania Mirza Birthday.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर ठरल्या केंद्र शासनाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्काराच्या मानकरी
IPL 2023: केकेआरला दुसरा झटका, बिलिंग्जनंतर कर्णधारानेही ट्विट करत पुढच्या हंगामात खेळण्यास दिला नकार