भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्या मान्यतेने संचालक, क्रीडा व युवक, हरियाणा राज्य यांच्यावतीने दिन दयाल उपाध्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा दि. २२ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये हिसार, हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रातिनिधिक पुरुष संघाची निवड करण्यात आली आहे
महाराष्ट्र संघाचे नेतृत्व अमीर धुमाळ कडे देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात उजवा कोपरारक्षकाची भूमिका अमीर कडे होती. तसेच ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांनी रायगड पुरुष संघाने विजेतेपद पटाकवले. यास्पर्धेत रायगड संघाचे नेतृत्व अमीर धुमाळ कडे होते.
रोहा येथे झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यप स्पर्धेत खेळल्या महाराष्ट्र संघातील दोनच खेळाडूचा संघात समावेश आहे. अमीर धुमाळ व्यतिरिक्त अजिंक्य पवार महाराष्ट्र संघात आहे. बाकी नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
पंडित दीन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियनशिपच्या तिसर्या पर्वासाठी हरियाणा सरकार सज्ज आहे. विजेते संघाला १ कोटी रूपये देण्यात येणार असून, पहिल्या स्पर्धेचे हरियाणा, तर दुसऱ्या स्पर्धेचे विजेतेपद सेनादल संघाने पटाकवले होते.
यास्पर्धेत १२ संघ सहभागी होणार असून त्यामध्ये वरिष्ठ सीनियर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम आठ संघ आणि व्यावसायिक ४ सर्वोत्तम संघ सहभाग घेणार आहेत. प्रथम तीन स्थान मिळवणार्या संघांना अनुक्रमे रु. १ कोटी, रु. ५०, रु. २५ लाख रोख देण्यात येणार आहेत.
स्पर्धा एकेएफआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल आणि एमेच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (एकेएफआय) च्या नियम लागू होतील. 85 किलो किंवा त्यापेक्षा कमी वजन असलेले खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतील आणि स्पर्धा मैटवर आयोजित केली जाईल.
महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे:
१) अमीर धुमाळ, रायगड (कर्णधार)
२) मार्तंड फूटें, बीड
३) परेश म्हात्रे, ठाणे
४) आशिष मोहिते, उपनगर
५) सूरज देसाई, नंदुरबार
६) अरविंद देशमुख, रत्नागिरी
७) प्रदीप शिंदे, रत्नागिरी
८) विजेंद्र सपकाळे, जळगाव
९) सचिन पाटील, पुणे
१०) कृष्णा गायके, जालना
११) सुलतान डांगे, रायगड
१२) अजिंक्य पवार, रत्नागिरी
प्रशिक्षक: रामचंद्र जाधव, मुंबई शहर
व्यवस्थापक: तानाजी भिलारे, सातारा