कराची: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद अमीर पाकिस्तान आणि विश्व ११ यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिका खेळू शकणार नाही कारण तो आपल्या मुलाच्या जन्मावेळी लंडनमध्ये आपल्या पत्नीसह राहू इच्छित आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीरने पीसीबी आणि मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याकडून परवानगी घेतली आहे आणि तो त्याच्या पत्नीबरोबर इंग्लंडमध्ये असणार आहे.
तथापि, इतर संघातील सदस्यांनी असा दावा केला आहे की अमीर लाहोरमध्ये मालिका रद्द करू शकतो कारण एसेक्ससाठीचा शेवटचा सामना खेळताना त्याला पाठीला दुखापत झाली होती.
“या वर्षी त्याने लागातार खूप क्रिकेट खेळले आहे आणि हे समजूत आहे की, या सामन्यात आमिरला खेळवून आणखीन दुखापत करून घ्यायची नाही कारण पाकिस्तानला या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे,” असे एका सूत्राने सांगितले आहे.
अमीरने जूनमध्ये ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतविरूद्ध पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब करत तीन विकेट्स घेतल्या होत्या. तो अंतिम सामना होता त्यामुळे तो पुन्हा पाकिस्तानला परतला नाही, कारण त्यानंतर तो काउंटी चँपियनशिपमध्ये एसेक्सकडून खेळण्यात व्यस्त होता.