कोणताही भारतीय क्रिकेट चाहता २४ ऑक्टोबर ही तारीख विसरू शकणार नाही. कारण या दिवशी विश्वचषकातील २९ वर्ष जुना इतिहास बदलला गेला. भारताला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या हातून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून क्रीडातज्ज्ञ, माजी दिग्गज आणि चाहते या सामन्याबाबत आपापली मते व्यक्त करत होते.
या हाय व्होल्टेज सामन्याआधी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगने भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्धची उत्कृष्ट आकडेवारी पाहून पाकिस्तानने भारताला वॉकओव्हर दिला पाहिजे असे म्हटले होते. मात्र, भारताचा पराभव होताच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही एक व्हिडिओ शेअर करत हरभजनची मजा घेतली. आता या वादात आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरनेही उडी घेतली आहे.
काय होते प्रकरण
या सामन्याची चर्चा सुरु झाली होती तेव्हा हरभजन सिंग याने एक व्हिडिओ शेअर करताना शोएब अख्तर याला खिजवत पाकिस्तानने हा सामना न खेळता भारताला वॉक ओव्हर दिला पाहिजे, असे म्हटले होते. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळविल्यानंतर आता अख्तरने म्हटले,
‘हरभजन आता वॉक ओव्हर घ्यायचा की नाही? काय करायचे? चला जाऊ द्या. आता हार पचवा.’
Haanji? Walk over chahiye tha @harbhajan_singh ? pic.twitter.com/6XSc5cpcPp
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 24, 2021
यानंतर हरभजनने त्याला उत्तर देताना, ‘जिंकल्याबद्दल अभिनंदन! तुम्ही आज उत्कृष्ट खेळतात’. आपण लवकरच क्रिकेटवर बोलूया.’
Theek hai theek hai.. Mubarak ho aap logo ko.. I am Very much here..see you on @Sportskeeda we shall discuss this game..enjoy you win https://t.co/qrV3BAtmWN
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 25, 2021
आमीरने घेतली वादात उडी
हरभजन आणि अख्तर यांच्या वादात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज व स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या मोहम्मद आमीर यानेदेखील उडी घेतली. त्याने ट्विट करत लिहिले,
‘सगळे कसे आहात? तुम्हाला हे विचारायचे होते की हरभजन पाजी तुम्ही टीव्ही तर तोडला नाही ना? जाऊद्या शेवटी हा क्रिकेटचा शानदार खेळ होता.’
hello everyone woh pochna yeah tha @harbhajan_singh paa ji ne TV to ni tora apna koi ni hota hai end of the day its a game of cricket 😊.
— Mohammad Amir (@iamamirofficial) October 25, 2021
पाकिस्तानने केली भारतावर मात
तब्बल २९ वर्ष आणि विश्वचषकातील १२ सामन्यांनंतर पाकिस्तानने भारतीय संघाला विश्वचषकातील सामन्यात पराभूत केले. भारताने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी नाबाद खेळ्या करत संघाला १० गड्यांनी अविस्मरणीय विजय मिळवून दिला. यासह पाकिस्तानने आपल्या विश्वचषकात मोहिमेची सुरवात विजयाने केली.
महत्त्वाच्या बातम्या-
शरमेची बात! भारताच्या पराभवानंतर काश्मीरच्या तरुणांना मारहाण; व्हिडिओ आला समोर
तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल