जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. कोची येथे होणाऱ्या या मिनी लिलावात 405 खेळाडूंचे नाव पुकारले जाईल. या यादीमध्ये सामील असलेला भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. या लिलावात आपल्याला नक्कीच कोणीतरी बोली लावेल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
अमित मिश्रा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक तीन हॅट्रिक देखील त्यानेच मिळवल्या आहेत. मात्र, मागील काही हंगामात त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यामुळे आयपीएल 2022 मध्ये त्याला कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तसेच आपल्या तंदुरुस्तीमध्ये देखील सुधारणा घडवून आणली.
नुकतेच त्याला एका मुलाखतीत आयपीएल 2023 लिलावाबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना अमित म्हणाला,
“आधी लोकांना वाटायचे टी20 क्रिकेटमध्ये लेगस्पिनर महागडे ठरतील. मात्र, आपण निकाल पाहत आहोत. मी, चहल आणि राशिद आयपीएलचे सर्वात यशस्वी गोलंदाज आहोत. मला वाटते की माझ्यामध्ये अजून दोन-तीन वर्षाचे क्रिकेट बाकी आहे. मी पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त आहे आणि कामगिरी देखील चांगली होतेय. आगामी लिलावात नक्कीच कोणीतरी माझ्यावर बोली लावेल.”
अमित मिश्रा हा आयपील इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 166 बळी टिपलेत. सध्या चाळीस वर्षांचा असलेला अमित यापूर्वी दिल्ली व हैदराबाद संघासाठी आयपीएल खेळला आहे.
(Amit Mishra Hoping He Will Sold In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या ‘व्हाईटवॉश’ जखमेवर या क्रिकेट संघाने चोळले मीठ! ट्वीटमध्ये लिहिले, ‘आम्ही पराभवास…’
पाकिस्तानचा डब्ल्यूटीसीमधून खेळ खल्लास, ‘हे’ चार संघ अजूनही गाठू शकतात फायनल